शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कार-दुचाकी अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:09 IST

वाघाडी फाटा : गंभीर दुखापत; अपघाताच्या घटनेमुळे हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : मुंबई-आग्रा महामार्गावर वाघाडी फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात गणेश बोरसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ त्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना तातडीने दाखल करण्यात आले़ या वेळी डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले़ ही घटना सोमवारी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान घडली़         गणेश निळकंठ बोरसे (पाटील) (३८, रा दत्ताने ता़ शिंदखेडा हल्ली मुक्काम लक्ष्मी नगर, सोनगीर ता धुळे)   हे (विना पासिंग) नवीन  घेतलेल्या होंडा कंपनीची  मोटार सायकलने आपल्या नोकरीच्या ठिकाणी बाभळे औद्योगिक वसाहतीकड जात असताना वाघाडी फाट्यावरून वळण घेत असताना धुळे कडून इंदोरकडे जाणारी कार क्रमांक एमएच ०४ जीजे  ६३६९ या भरधाव येणाºया वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली व मोटरसायकल सह कार वर जोरदार आदळली़ यावेळी त्यांना तात्काळ येथील स्थानिकांच्या मदतीने टोलप्लाझाच्या रुग्णवाहिकेद्वारे सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मयत घोषित केले़ दरम्यान, मोटर सायकलला धडक देणारी कार ही भार्इंदर , ठाणे येथील व चालक चे नाव शेख सगीर अहमद अब्दुल रशीद असल्याचे समजते़दरम्यान मृत युवक हे बाभळे औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत  कामाला होते. गेल्या तीन वर्षांपासून सोनगीर येथील लक्ष्मी नगर मध्ये राहत होते़ त्यांच्या पश्च्यात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे़ घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू  आहे. दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात होऊन मयत झाल्याने पुन्हा महामार्गावर असलेल्या विविध त्रुटींबाबत चर्चा होऊ लागली़ मात्र संबंधित कंपनी अपघात झाल्यानंतर आपल्या चुका दुर्लक्षित करीत असते़ वाघाडी रस्त्यापर्यंत दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रस्ता तात्काळ तयार केला गेला पाहिजे, अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष चेतन चौधरी यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली़ 

टॅग्स :Dhuleधुळे