लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महिलेची बदनामी करण्याच्या कारणावरुन धुळे तालुक्यातील दापुरा येथे दोन गट समोरा-समोर भिडले़ त्यातून हाणामारीची घटना गुरुवारी घडली़ याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद सोनगीर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने १६ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ दापुरा येथील वसंत एलजी पाटील हा गावातील विवाहित महिलेची बदनामी करतो, असे म्हणत गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रामकृष्ण काशिनाथ पाटील, भरत रामकृष्ण पाटील, किशोर बाळूराम पाटील, बालुराम काशिनाथ पाटील, शशिकांत संतोष पाटील, संतोष दयाराम पाटील, काशिनाथ दयाराम पाटील यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असा आरोप यांच्यावर करण्यात आला आहे़ याप्रकरणी वसंत पाटील यांनी यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़ त्यानुसार संबंधितांविरुध्द संशयावरुन गुन्हा नोंदविण्यात आला़ तर दुसºया गटातील मोतनबाई रामकृष्ण पाटील या महिलेने तक्रार दाखल केली़ त्यानुसार, पंकज एलजी पाटील, वसंत एलजी पाटील, प्रविण मोतीलाल पाटील, प्रकाश पाटील, प्रविण वसंत पाटील, आनंदा पोपट पाटील, शरद पाटील, शरद काशिनाथ पाटील, सचिन प्रकाश पाटील यांनी धक्काबुक्की केली़ याप्रकरणी दोनही गटातर्फे सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्याने एकत्रित १६ जणांविरुध्द संशयावरुन गुन्हा नोंदविण्यात आला़ घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल ए़ एस़ पवार करीत आहेत़ या घटनेमुळे गावात तणाव आहे़
बदनामीच्या वादावरुन दापुºयात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 17:32 IST
परस्परविरोधी फिर्याद : १६ जणांविरुध्द गुन्हा
बदनामीच्या वादावरुन दापुºयात हाणामारी
ठळक मुद्देधुळे तालुक्यातील दापोरा येथील घटनावादातून उमटले तीव्र पडसादपरस्परविरोधी फिर्याद दाखल