शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

शाळेची जीर्ण इमारत धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:49 IST

लगत भरते अंगणवाडी : शाळा सुटेपर्यंत पालकांचा जीव लागतो टांगणीला

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील केंद्रीय जिल्हा परिषद कन्या शाळा नं. २ नादुरुस्त इमारत जमीनदोस्त करा. जवळच अंगणवाडीचे वर्ग भरत असून वादळी वाऱ्यामुळे, तसेच जीर्ण झालेल्या भिंती पावसामुळे पडून गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.मालपूर येथील केंद्रीय जिल्हा परिषदेची शाळा असून या स्वतंत्र तीन शाळा आहेत. शाळा नं. १ व कन्या शाळा नं. २ या एकाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ स्वतंत्र भरतात. पैकी कन्या शाळेची पश्चिमेकडील इमारत नादुरुस्त असल्याचे दिसून येते.येथे तीन वर्गखोल्या असून दोन वर्गांना नवीन पत्रा टाकला आहे, तर एका खोलीचा अर्धवट उडालेला पत्रा असून भिंती देखील जीर्ण झालेल्या दिसून येतात. परतीचा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे या भिंती अधिक भिजून जीर्ण झाल्या आहेत. अजूनही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीचा धोका कायम आहे. तसेच वारा वादळ आल्यास पत्रा उडून व भिती कोसळून मोठी दुर्घटना घडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.या इमारतीला लागून जवळच अंगणवाड्यांचे वर्ग भरत असतात. तसेच शाळा नं. १ व २च्या लहान विद्यार्थ्यांचा येथील पटांगणात सतत वावर दिसून येतो. यासाठी ही इमारत तात्काळ जमिनदोस्त करण्याची गरज आहे. अन्यथा दिवसा वादळ वाºयासह जोरदार पाऊस आल्यास गंभीर घटना घडनू कोणाला जीव गमवावा लागल्यास अन्यथा जखमी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकवर्गाच्या चर्चेतून पुढे येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे