शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

शेतात पाणी शिरुन पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 22:23 IST

मालपूर : कालव्यांची दुरुस्ती न करता अमरावती प्रकल्पातून पाणी सोडल्याचा आरोप

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर कालव्याची दुरुस्ती केली असती तर शेतकºयांचे नुकसान टळले असते. आता झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल शेतकºयांनी केला आहे.१४ वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठा झाला. मात्र, १० सप्टेंबरपर्यंत पाण्याची पातळी २२४.४५ मीटर एवढी ठेवावी लागत असल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले. यासाठी डाव्या व उजव्या कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पाणी शेतात झिरपल्याने मालपूर, सुराय, मांडळ, खर्दे येथील शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिरावला जाण्याची भिती निर्माण झाली आहे. या प्रकल्पाला सुमारे ७ कि.मी. डावा व १४.२० कि.मी. उजवा कालवा असून याद्वारे मेथी, विखरण आणि कामपूर येथील पाझर तलाव भरण्याची तरतूद आहे. मालपूर ग्रामस्थांनी विखरण पाझर तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला होता. यासाठी ठिय्या आंदोलनही केले होते. मात्र, २७ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे व विखरणचे सरपंच महेंद्र पवार यांनी कालव्याच्या गेटचे पूजन करुन पाणी सोडले.डाव्या व उजव्या कालव्यात प्रचंड काटेरी वृक्ष वाढले असून हेडरेग्युलेटरची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी मातीचा बांध फुटलेला आहे. तसेच कालव्यात प्रचंड मातीचे ढिग आहेत. यामुळे कालव्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र, पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष करुन घाईगडबडीने हे पाणी सोडल्यामुळे शेतकºयांच्या कंबरेएवढ्या कापूस पिकात पाणी साचू लागल्यामुळे सर्व पिकच वाया जाणार आहे. काही ठिकाणी कापूस आपोआप पाण्यामुळे मुळासकट उखडून निघाले आहे. काही ठिकाणी भुईमूग, मूग आदी शेतात सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.विखरण पाझर तलाव भरण्यासाठी सोडण्यात आलेले हे पाणी अद्याप तिथे पोहोचलेले नाही. खर्दे, मांडळ येथील लेंढुर नाल्यामध्ये गळती लागल्यामुळे या नाल्याने नदीचे नदीचे स्वरुप धारण केले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. फरशीवरुन पाणी वाहत असल्यामुळे खर्दे, मेथी, वरझडीकडे जाणारा रस्ता बंद झाला असून यामुळे रस्त्याची देखील दुरवस्था होणार आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत करत आहे. विखरण तलावातही पाणी पोहचत नाही व खर्दे ते मालपूर दरम्यान प्रचंड शेती पिकांचे नुकसान होत आहे. तरी पाणी सोडण्याचा एवढा हट्टाहास का, असा सवाल येथील नागरिकांकडून  व्यक्त होत आहे. अगोदर कालव्याची दुरुस्ती करावी व नंतर पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.या सोडलेल्या पाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून पाण्याची पातळी समान ठेवण्यासाठी हे पाणी अमरावती नदीत सोडावे व शेतकºयांचे पिक वाचवावे, अशी मागणी मालपूरसह परिसरातील शेतकºयांनी केली आहे.अमरावती प्रकल्पाच्या नादुरुस्त उजव्या कालव्यामुळे माझ्या शेतात पाणी पाझरुन दोन एकराच्या वर कापूस पिक वाया गेले आहे. याला जबाबदार कोण, भरपाई कोण देणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अगोदर पाट दुरुस्ती करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, आमचे ऐकून घेतले नाही, घाईगडबडीत पाणी सोडण्यात आले. हे पाणी त्वरित बंद  करण्यात यावे व प्रथम पाटचारी दुरुस्त करावी आणि मगच पाणी सोडावे.झालेल्या नुकसानीची जबाबदारी स्विकारुन पाटबंधारे विभागान भरपाई द्यावी-बापू रामचंद्र पाटील, शेतकरी मालपूरशेती पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे पाणी कमी केले आहे. मांडळजवळ नाल्यावर गळती लागली आहे. यामुळे मेथी, खर्दे, वरझडी रस्ता काल बंद होता. प्रकल्पात पातळी वाढल्यास अमरावती नदीत पाणी सोडण्यात येईल. -प्रशांत खैरनार, अभियंता पाटबंधारे विभाग अमरावती प्रकल्प, मालपूर

टॅग्स :Dhuleधुळे