शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात राजकुमार सूर्यवंशी यांना दामा भूषण तर अरूण साळुंके यांना दामा मित्र पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 21:42 IST

इंडियन मेडीकल असोसिएशन व डॉ. आंबेडकर मेडीकोज असोसिएशन यांच्या विद्यमाने कार्यक्रम

ठळक मुद्देडॉ. आंबेडकर मेडिको असोसिएशनतर्फे दरवर्षी दामाकॉन पुरस्कार हा वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया मान्यवरांना दिला जातो. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सूत्रसंचालन डॉ. अभिनय दरवडे यांनी केले.यशस्वीतेसाठी जयप्रकाश पुपलवाड, श्रद्धा मोरे, विक्रम शिंदे, निकीता मोहीत, वैष्णवी जाधव, मोहिनी मोरे, कार्तिक खेडकर, पवन खरात, पूजा नांगरे, निखिल वानखेडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  इंडियन मेडीकल असोसिएशन, धुळे व डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दामाकॉन वैद्यकीय शैक्षणिक परिषद व दामाकॉन २०१८’ या पुरस्काराचे वितरण रविवारी जेलरोडवरील आयएमए सभागृहात झाले. या कार्यक्रमात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांना ‘दामा भूषण’ तर ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ तथा जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन डॉ. अरूण साळुंके यांना ‘दामा मित्र’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.   प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन  झाले.  या वेळी भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. अरूण मोरे, आयएमए धुळे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, कार्याध्यक्ष डॉ. नीता हटकर, सचिव डॉ. पराग उपकारे, दामा अध्यक्ष डॉ. दीपक शेजवळ, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप सोनवणे, सचिव वैभव खिल्लारे आदी उपस्थित  होते. 

विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची तयारी ठेवाकार्यक्रमात प्रा. बाबा हातेकर यांनी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विद्यार्थी’ या विषयावर मार्गदर्शन केले.  बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करीत विविध पदव्या संपादित केल्या. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आता सर्व सोयी, सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वी अशा सुविधा नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कष्ट घेत नावलौकीक मिळविले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला. याप्रसंगी आयएमतर्फे घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच  आयएमए शाखेत कर्मचाºयांनाही गौरविण्यात आले.  

टॅग्स :Dhuleधुळे