शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहिवेलच्या तरुणाची धुळ्यात गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 13:32 IST

देवपुरातील घटना : पश्चिम देवपूरला अकस्मात मृत्यूची नोंद

ठळक मुद्देदेवपुरात तरुणाने घेतला गळफासप्रेमप्रकरणातून झाल्यास अंदाजपश्चिम देवपूर पोलिसात नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील दहिवेल येथील तरुणाने धुळे शहरातील देवपूर भागातील उन्नती कॉलनीच्या उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारालाच गळफास घेतला़ ही घटना गुरुवारी पहाटे उजेडात आली़ पश्चिम देवपूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते़ दरम्यान, प्रेम प्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ साक्री तालुक्यातील दहिवेल येथील संकेत सुरेश गवळी (१८) याने जयहिंद संस्थेमध्ये १२ विज्ञानचे शिक्षण पूर्ण केले होते़ त्यानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी तो धुळ्यात आला होता़ त्याच्या सोबत त्याचे वडील आणि अन्य होते़ प्रवेश प्रक्रियेचे काम आटोपल्यानंतर ते सर्व साक्री तालुक्यातील दहिवेल गावाकडे जाण्यासाठी निघाले होते़ बुधवारी रात्री धुळ्यालगत काही खाण्यासाठी ते थांबले़ सर्वांची नजर चुकवून संकेत तेथून पसार झाला़ तो कुठे गेला याची शोधाशोध सुरु झाली़ त्याच्या मित्राशी संपर्क साधण्यात आला़ कालांतराने त्याने देवपुरातील नकाणे रोडवरील शिवप्रताप कॉलनीजवळ उन्नती कॉलनीच्या गार्डनच्या प्रवेशद्वाराला त्याने गळफास घेतल्याची माहिती त्याच्या वडिलांना मिळाली़ ही घटना पहाटे घडली़ पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने दाखल झाले़ त्याला वैद्यकीय उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ तपासणी करुन त्याला डॉक्टरांनी मयत घोषीत केले़ त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले़ दरम्यान, हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाल्याचा कयास लावला जात आहे़ या वृत्ताला संकेतचे वडील सुरेश गवळी यांनी देखील दुजोरा दिला आहे़ सुरेश गवळी हे दहिवेल येथे माध्यमिक शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत़ संकेतच्या पश्चात आई, वडील आणि १ बहिण असा परिवार आहे़ संकेतच्या बहिणीचे लग्न झाले असून त्याला एक भाची देखील आहे़ पश्चिम देवपूर पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत़

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा