शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

पाटचारी फुटल्याने आवर्तन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:29 IST

शेतक-यांना रब्बीची चिंता : धरण बचाव संघर्ष समितीतर्फे पाचटचारी दुरुस्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवेल : मालनगाव धरणाचे पाणी रब्बी हंगामासाठी २९ नोव्हेंबरला सोडले होते. यासाठी लोकमतनेच पाठपुरावा केल्यामुळेच आवर्तन सोडण्यात आले होते. पहिल्या आवर्तनाला साधारण एक महिना लागतो. मात्र सातव्या दिवशीच पाटचारीला भगदाड पडले. पाटचारी तुटल्याने पाणी बंद झाले. आता पाटचारीचा भराव केव्हा होतो, केव्हा पाणी सुटेल. रब्बी हंगाम वाया जाईल का असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाटचारी का फुटली? याबाबतही शेतकºयांमध्ये शंका व्यक्त होत आहे.मालनगाव धरण ४०० एमसीएफटीचे आहे. रब्बी हंगाम ३१ आॅक्टोबर ते २८ फेब्रुवारीपर्यंत असतो. आता दीड महिना उशिरा हंगाम सुरू होत आहे. शेतकरी रब्बी पिकासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. मात्र शाखा अभियंत्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. पाट दुरुस्तीसाठी मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. आमदार डी.एस. अहिरे यांनी पाटदुरुस्तीसाठी जेसीबी मशिन उपलब्ध करुन दिले होते. याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शहापुरे यांच्याशी संपर्क साधून प्रस्तुत प्रतिनिधीने वरील अडचण सांगितली. त्यांनी शाखा व उपअभियंता यांना बोलवून अडचण समजून घेतली व तात्काळ पाणी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र शेतकºयांना रब्बी पिकाला पाणी मिळावे यासाठी पाटबंधारे प्रशासन चालढकल करीत होते. पण शेतकºयांची व्यथा ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली. अखेर २९ नोव्हेंबरला रब्बी हंगामाला पाणी सोडले. ५०० पेक्षा जास्त शेतकºयांनी पाणी अर्ज भरले. रब्बीची पेरणी तयार केली. काहींनी प्रत्यक्ष रब्बी पिकाची पेरणीही केली. १० ते १५ टक्के पहिल्या आवर्तनाचे पाणी भरले. तेवढ्यात सात डिसेंबरला रात्री धरणापासून ६५० मीटर अंतरावर पाटचारीला भगदाड पडले. पाटचारी तुटली, रात्रीतून ४० ते ५० क्यूसेस पाणी नदीत वाहून गेले. सकाळी पाटबंधारे विभागाने पाटचारीतून पाणी बंद केले. आता पाट दुरुस्तरीसाठी निधी मागणी अहवालाचे कागदी घोडे नाचवून पाणी केव्हा सुटेल हे सांगता येत नाही, असे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतातूर झाला आहे.शेतकºयांमध्ये अशीही चर्चा आहे की, पाटचारीला भगदाड कसे पडले याबाबतही चौकशी होणे गरजेचे आहे. कारण वीज वितरण कंपनीचा मेन लाईनला साक्रीजवळ कावठे शिवारात बिघाड झाला तो सापडायला व विद्युत पुरवठा शेतकºयांना मिळायला २४ तास लागले. हा योगायोगच आहे का? अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. पाटबंधारे अधिकाºयांनी तात्काळ दखल घ्यावी व फुटलेली पाटचारी दुरुस्तीची मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे