शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील ‘त्या’ घटनेतील दोषींना निश्चित शासन होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 14:58 IST

विनयकुमार चौबे : सीसीटीव्हीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार

ठळक मुद्देविशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी केली घटनास्थळाची पाहणीघटनेतील दोषीविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदशिवसेनेच्या पदाधिकाºयांनी घेतली विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट, दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील गजानन कॉलनी, अरिहंत मंगल कार्यालय परिसरात बुधवारी रात्री तणाव झाला होता़ या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने दोषींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़ या घटनेत कोणाचा किती संबंध आहे, हे तपासून दोषींना शासन केले जाईल, असे नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ शहरातील ८० फुटी रोडवरील अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात किरकोळ कारणावरुन बुधवारी रात्री दोन समुदायात दंगल उसळली़ या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता़ अधिकाºयांसह पोलिसांनी घटनास्थळी जावून परिस्थिती नियंत्रणात आणली़ या घटनास्थळाची पाहणी गुरुवारी दुपारी विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी केली़ यावेळी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ चौबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली़ त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात चौबे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, जी काही घटना घडली ती उचित नाही़ त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे़ घटना आटोक्यात आली आहे़ याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे़ हे प्रकरण गांभिर्याने घेतले असून जे होईल ते कायदेशीर केले जाईल़ अशी घटना यापुढील काळात पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल़ हा परिसर अतिसंवेदन असल्यामुळे स्वतंत्र चौकीसह वायरलेस प्रणाली, आवश्यक त्या प्रमाणात पोलीस तैनात केले जातील़ सीसीटीव्ही कॅमेराबाबत शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले़ शिवसेनेने दिले निवेदनविशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांना शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी घटनेसंदर्भात निवेदन सादर केले़ यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, प्रा़ शरद पाटील, महेश मिस्तरी, अतुल सोनवणे, संजय गुजराथी, सतिष महाले उपस्थित होते़ या पदाधिकाºयांनी बुधवारी घडलेल्या घटनेचा वृत्तांत कथन केला़ नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली़ हा परिसर संवेदनशिल असून पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली़ सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर योग्य ती दखल घेतली जाईल़ दोषींना शासन होईल़ सर्व बाबी तपासूनच चार्जशिट दाखल केले जाईल असे आश्वासन चौबे यांनी दिले़