धुळे : दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठात विद्यार्थीवर गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थी संघटनांनी भ्याड हल्ला करीत अमानुषपणे मारहाण करण्यात आली़ सत्यशोधक विद्यार्थी संघटनेकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला़जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेएनयु विद्यापीठातील परीक्षा शुल्कात केलेली वाढ आणि विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा देशभरात निषेध होत आहे़ विद्यार्थ्यांवर होणाऱ्या भ्याड हल्याची घटना लोकशाही व शिक्षण पध्दतीला काळीमा फासणारी आहे़ या घटनांना पाठीशी घालणाºया सरकार व पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याने सत्यशोधक संघटनेकडून निषेध करण्यात येत असल्याचे शेवटी निवेदनात म्हटले आहे. निवेदन दिल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी काजल मोरे, सिध्दांत बागुल, जितेंंद्र आहिरे, मनोज नगराळे, राकेश आहिरे, राहूल आहिरे, सुजीत गेडाम, मानसी पवार, विरेंद्र नाईक, अक्षय वाडीले, प्रविण कोळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केलीत़
भ्याड हल्याचा संघटनेकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 23:15 IST