अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयात दिव्यांगांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:46 AM2021-02-25T04:46:55+5:302021-02-25T04:46:55+5:30

केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ नुसार अपंगत्वाच्या २१ प्रकारांमध्ये अपंगत्वाचे प्रमाण निश्चित करून तसे प्रमाणपत्र देण्याचे आदेश ...

Crowds of disabled people at government hospitals to get disability certificates | अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयात दिव्यांगांची गर्दी

अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयात दिव्यांगांची गर्दी

Next

केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ नुसार अपंगत्वाच्या २१ प्रकारांमध्ये अपंगत्वाचे प्रमाण निश्चित करून तसे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हिरे वैद्यकीय रुग्णालयालयात दर बुधवारी आणि गुरुवारी अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. त्याची माहिती रुग्णालयाच्या यंत्रणेमार्फत ऑनलाइन भरली जाते आणि दिव्यांगांना नोंदणी क्रमांक दिला जातो. दिव्यांगाची तपासणी व प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हाभरातील दिव्यांग मोठ्या संख्येत येतात.

जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे सर्व उपचारावरील एकच रुग्णालय असल्याने याठिकाणी केसपेपर काढण्यासाठी गर्दी अधिक असते. तर दिव्यांगाना केसपेपर काढण्यासाठी कोणतही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तरीही दिव्यांगाना कसरत करावी लागत आहे.

दोन दिवस तपासणी व दोन दिवस प्रमाणपत्र वाटप

शासकीय कामकाज व दिव्यांगाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेले दिव्यांगाचे प्रमाणापत्र ग्राह्य धरले जाते. जिल्ह्यात केवळ हिरे महाविद्यालयातच दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोना काळात अनेक महिने दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप व नोंदणी बंद करण्यात आलेली होती. सद्या प्रमाणपत्र वितरण व तपासणी केली जात असल्याने दिव्यांगाची मोठ्या प्रमाणात वितरण होत आहे. बुधवार व गुरुवार असे दोन दिवस तपासणी व प्रमाणपत्राचे वाटप केले जाते. यात २०० ते २५० पर्यंत प्रमाणपत्र वाटप होत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

यांना लागते सवलतीचे वैद्यकीय प्रमाणपत्र

अस्थिव्यंग, अंध, कर्णबधिर, गतिमंद, मूकबधिर, मनोरुग्ण केवळ या प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि शैक्षणिक कारणांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. दहावी आणि बारावीची परीक्षेचे वेळापत्रक निश्चित झाल्यामुळे एसएससी बोर्डाला अपंगांना सवलतीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते. अंधांना रायटर मिळविणे, विषयांमध्ये सवलत मिळविणे, परीक्षेसाठी वेळ वाढवून मागणे, जवळील परीक्षा केंद्र मिळविणे यासारख्या सवलती अपंगांना या प्रमाणपत्रानंतरच दिल्या जातात. त्यामुळे सद्या हे अपंग विद्यार्थी सीपीआरमध्ये गर्दी करत आहेत.

Web Title: Crowds of disabled people at government hospitals to get disability certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.