म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी टास्क फोर्सची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:35 AM2021-05-16T04:35:11+5:302021-05-16T04:35:11+5:30

म्युकरमायकोसिस आजाराबाबत विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी आमदार डॉ़ फारूक शाह यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी ...

Create a task force for the treatment of mucomycosis | म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी टास्क फोर्सची निर्मिती करा

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी टास्क फोर्सची निर्मिती करा

Next

म्युकरमायकोसिस आजाराबाबत विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी आमदार डॉ़ फारूक शाह यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी आमदार डॉ़ शाह बोलत होते़ यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, कोरोना नोडल अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, दंत विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पाटील, मेडिसिन विभागाचे भाऊलाल वाघ, डॉ. दीपश्री नाईक, डॉ. बापू पवार आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ़ शाह म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण कोरोना मुक्त होत आहे. परंतु काही रुग्णांना कोरोना उपचार नंतर अनेक व्याधींचाही सामना करावा लागतोय़ त्यात प्रामुख्याने म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने अनेक रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम होतोय़ त्यासाठी पोस्ट कोविड सेंटरवर कान, नाक, घसा तज्ञांची नेमणूक करण्यात यावी. कोविड झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची नियमितपणे तपासून करण्यात यावी. या आजारांची गंभीर स्वरूप विचारात घेता या करता योग्य ती पूर्व तयारी करण्याच्या दृष्टीने तसेच टास्क फोर्स गठीत करून यामध्ये जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय धुळे, मनपा रुग्णालय आणि खाजगी डॉक्टरांचाही समावेश करण्यात यावा. शासनामार्फत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश करण्यात आला असून जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय धुळे, मनपा रुग्णालय आणि खाजगी डॉक्टरांच्या एकत्रित मदतीने कामकाज करण्यात यावे. जनआरोग्य योजनेत कान, नाक व घसा यावर उपचार करणाºया ज्या रुग्णालयांचा समावेश नाही त्यांचा तातडीने समावेश करण्यात यावा. तसेच खाजगी डॉक्टरांनी यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले़

सद्यस्थितीतील कोरोना उपचारांमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत काय जेणेकरून या आजाराचा उपसर्ग टाळता येईल तसेच जिल्ह्यातील आजची वैद्यकीय व्यवस्था विचारात घेत त्यामध्ये आधी काय सुधारणा करणे आवश्यक आहे याची माहिती देखील आमदार शाह यांनी जाणून घेतली. याबाबत रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटर मधून तपासण्या करून घेण्याचे आवाहनही आमदार फारूक शाह यांनी केले.

Web Title: Create a task force for the treatment of mucomycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.