शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धुळेनजिक अवधानला शेड लावण्यावरुन हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:15 IST

मोहाडी पोलीस : ७ जणांविरुध्द गुन्हा

ठळक मुद्देअवधान गावानजिक हाणामारीलोखंडी रॉडसह लाकडी दांडक्याचा वापर७ जणांविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पत्र्याचे शेड लावू दिले नाही या कारणावरुन अवधान शिवारातील मनीष सर्व्हिस सेंटरजवळ हाणामारीची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली़ यावेळी लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याचा वापर झाल्याने तीन जणांना दुखापत झाली़ मोहाडी पोलिसात शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ७ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ धुळे तालुक्यातील अवधान येथे राहणारा सुनील भगवान गोसावी (३८) याने मोहाडी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मनीष सर्व्हिस सेंटर आहे़ या ठिकाणी पत्र्याचे शेड लावू दिले नाही या कारणावरुन दोन गटात वाद झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले़ ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ ते साडेसहा वाजेच्या सुमारास झाली़ हाणामारीत लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याचा वापर झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ यात सुनील भगवान गोसावी, शरद भगवान गोसावी, परमानंद वेडूगीर गोसावी (सर्व रा़ अवधान ता़ धुळे) हे जबर जखमी झाले़ त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी सुनील गोसावी याने मोहाडी पोलीस स्टेशनला शनिवारी पहाटे अडीच वाजता फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित सुरेश मुरलीधर गोसावी, मुकेश मुरलीधर गोसावी, आनंदा मुरलीधर गोसावी, मुरलीधर दगा गोसावी, संजय दगा गोसावी, ऋषिकेश संजय गोसावी, गणेश संजय गोसावी (सर्व रा़ अवधान ता़ धुळे) या संशयितांविरोधात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ संशयितांना पकडण्यात आलेले नाही़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस