निजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर खुडाणे शिवारात शुक्रवारी पहाटे बिबट्याने हल्ला चढवत एका गाईचा फडशा पाडला आहे.खुडाणे येथील विक्रम नागो गवळे यांच्या गट नंबर २४/१ मध्ये शेती असून शुक्रवारी पहाटे बिबट्याने गायीच्या शेड मध्ये हल्ला चढविला व ५ वर्ष वयाच्या गाभण गाईस फाडून ठार केले. अनेक महिन्यांच्या अंतराळानंतर बिबट्याचा संचार दिसला. पंचनामासाठी पोलिस पाटील अनिल जाधव, वनपाल राहूल देसले, शेतकरी विक्रम नागू गवळे, भैय्या गवळे, मनोज रामीकर, पोपट धनगर, मोठाभाऊ गवळे,राकेश गवळे उपस्थित होते. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ, गावीत यांनी उत्तरीय तपासणी केली.
खुडाणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 22:51 IST