शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'न्यायालयानेही आदेश दिलेत, लवकरच 'मेगा भरतीला' सुरुवात होईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 16:16 IST

राज्य सराकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागांमध्ये सर्वाधिक 11 हजार जागा या ग्रामविकास खात्यामध्ये भरण्यात येणार आहेत.

धुळे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा भरतीबाबत माहिती दिली. राज्य सरकारने 72 हजार मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. आज, धुळे येथे मुख्यमंत्र्यांना मेगा भरतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, मेगा भरतीबाबत लवकरच निर्णय होईल. न्यायालयानेही आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच जागा निघतील, आता कोणतीही अडचण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून (एसटी) आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी, अशी मागणी धनगर समाजाच्या संघटनांच्या वतीने करण्यता आली होती. तर, या मेगाभरतीला विरोध करत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयानेही काही तात्काळ भरतीप्रक्रिय सुरु करण्यास आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे मेगा भरतीचे काय, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विचारण्यात आला. फडणवीस हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, लवकरच मेगा भरती होईल, न्यायालयानेही निर्णय दिला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

राज्य सराकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागांमध्ये सर्वाधिक 11 हजार जागा या ग्रामविकास खात्यामध्ये भरण्यात येणार आहेत. त्यानंतर, आरोग्य खात्यात 10,568 जागा भरण्यात येतील, तर तिसऱ्या क्रमांकावर सार्वजनिक बांधकाम विभागात जागा भरण्यात येतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण 72 हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे जाहीर केले होते. 

* कोणत्या खात्यात किती जागा?

आरोग्य खाते – 10,568गृह खाते – 7,111ग्रामविकास खाते – 11,000कृषी खाते – 2500सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337नगरविकास खाते – 1500जलसंपदा खाते – 8227जलसंधारण खाते – 2,423पशुसंवर्धन खाते – 1,047

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसjobनोकरीDhuleधुळे