विंचूर : धुळे तालुक्यात यंदा संततधार पावसाने बाजरी, ज्वारी, मका ही पिके चाºयासह सडून गेली आहेत. तर बहुतांश कापूसही अवघ्या दोनच वेचणीत संपेल, असे विदारक चित्र तालुक्यातील शिरुड, जुनवणेसह जिल्ह्यातील बहुतांश शिवारात आहे.यंदा खरीपात सततच्या पावसाने दसरा सणानंतर आठवडाभर विश्रांती घेतली. मात्र कापसाची आधीची फुलफुगडी गळून पडली. आधी लागवड झालेल्या कपाशीच्या पक्कया कैºया सडल्या, अशी कैफियत कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली. यातच आठवडाभरात उन्हाने कपाशी बहरायला पुन्हा प्रारंभ झाला. तोच दिवाळीच्या सुमारास सलग १० दिवस मध्यम ते जोरदार तसेच भिज पावसाने या पिकाचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडांची पाने पिवळी पडली, नव्याने आलेली फुलेही बरीचशी झटकून जमिनीवरच पडून सडली. जेमतेम दोन चार कैºया लागलेल्या आहेत. जास्त पाणी साठल्याने त्यामुळे पानांचा रंग पिवळा पडल्याने पुन्हा बहर येणे शक्य वाटत नाही, असे कृषी सहायक पी.ई. लांबोळे यांनी आर्वी, बेंद्रेपाडा येथील पाहणीवेळी सांगितले. दिवाळीनंतर चार ते पाच महिने वेचला जाणारा कापूस पुढील १५ दिवसांत फक्त दोनच वेचणीत संपेल, अशी परिस्थिती आहे. शेतकºयास रोख रक्कम मिळवून देणारे पांढरे सोने चिखलात दडल्याने उत्पन्न लक्षणीय घटणार असल्याचे यातून स्पष्ट होते. मुलांचे शिक्षण, विवाह समारंभ, वृद्ध आईवडिलांवरील उपचार आदी बाबी पूर्ण होणे तर दूर; पण गेल्या तीन वर्षांपासून होणाºया अत्यल्प उत्पन्नाने शेतकरी व मजुरांचे रोजचे जीवन अवघड बनले आहे.धुळे तालुक्यातील शेतकºयांच्या कोरडवाहू व बागायती शेतातील खरीप हंगामात बाजरी, ज्वारी, मका याप्रमाणेच विशेषत: मध्यम ते हलक्या जमिनीतील कापूस पिकाची मोठी हानी झाल्याने शेतकरी हतबल ठरला आहे. शासनामार्फत तातडीने आर्थिक मदत व कर्जमुक्ती ही अपेक्षित आहे. याबाबत पीकविमा धारक शेतकºयांंनी नुकसानीबाबत सूचना अर्ज विमा कंपनीला शासनामार्फत द्यावा की नाही, या संदर्भात शिरुड, निमगुळसह परिसरातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत. सध्या कपाशीबाबत नुकसान अर्ज देण्याचा कुठल्याही सूचना नाहीत. कारण कापूस वेचणीबाबत कृषी, महसूल विभाग व विमा कंपनी आदींचा पीक काढणी प्रयोग, उंबरठा उत्पन्नाचा अंदाज घेतल्यानंतर नुकसानबाबत आढावा घेतला जातो, असे कृषी सहायक सुमित नगराळे यांनी सांगितले. सध्या अनेकांचा कापूस वेचणीवर आला असून त्यात चक्रीवादळाच्या बातम्यांमुळे पाऊस पुन्हा आला तर काय? ह्या भीतीने एकाचवेळी सर्वांना वेचणीसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे प्रत्येकी मजुरीचा दरही ५० ते ७० रुपयांनी वाढली, असे शेतकरी कृष्णा बाबूलाल देसले, विनायक देवरे गणेश बोरसे, दिलीप खिवसरा यांनी सांगितले. कपाशीखालील क्षेत्रही नेहमीच अधिक असते. परतीच्या पावसाने या पांढºया सोन्याची हिरवी पाने पिवळी झटकली, वाढ खुंटली, बहर खाली गळून पडला. त्यामुळे फरदड घेता येण्याची शक्यता दिसत नाही. उलट पुढील दोन वेचणीत संपूर्ण कपाशी पीक संपण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग रडकुंडीला आला आहे.
अवघ्या दोन वेचणीत संपणार कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:48 IST