शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’मुळे ठेकेदारांची निविदांकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 17:29 IST

महापालिका : स्थायी समितीच्या सभेत सदस्यांची ओरड, घंटागाड्यांना ‘जीपीएस’ बसविण्याची मागणी

ठळक मुद्देबांधकाम प्रक्रियेमुळे सध्या गोंधळ होत असला तरी लवकरच आॅनलाईन होणार आहे़ घरकुल योजना दोन टप्प्यात राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील योजनेच्या अहवालात काम पूर्ण झाल्याचे व दुसºया टप्प्यातील योजनेच्या अहवाल काम अपूर्ण असल्याचे नमुद आहे़ नगररचना विभागात बांधकामांचे ‘प्लॅन’ मंजूरीसाठी आले असता प्लॅन वेगळाच मंजूर होतो व प्रत्यक्षात बांधकाम मात्र वेगळेच होते, असा आरोप साबीर सैय्यद यांनी केला़

आॅनलाईन न्यूज नेटवर्क धुळे : महापालिकेला एकाच कामासाठी वारंवार निविदा काढाव्या लागत असून त्यामुळे मोठे नुकसान होत आहे़ जीएसटीमुळे ठेकेदार निविदांकडे पाठ फिरवित असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी मनपा सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत केली़ विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभेत मंजूर करण्यात आले़ महापालिका स्थायी समितीची सभा गुरूवारी पार पडली़ या सभेला सभापती कैलास चौधरी, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रविंद्र जाधव यांच्यासह सर्व सदस्य व अधिकारी वर्ग उपस्थित होता़ सभेत नगरसेवक संजय गुजराथी यांनी जीएसटीबाबत विचारणा केली़ जीएसटीची आकारणी कशी होत आहे़, बिलांवर जीएसटी का आकारला जात आहे? यांसारखे प्रश्न त्यांनी उपस्थित केले़ त्याचप्रमाणे मनपाला एकाच कामासाठी वारंवार निविदा काढाव्या लागत असून त्यावर मोठा खर्च करावा लागत आहे़ मात्र जीएसटीमुळे फटका बसत असल्याने ठेकेदार निविदा भरत नाही, असे ते म्हणाले़ त्यावर खुलासा करतांना आयुक्त सुधाकर देशमुख यांनी जीएसटी केवळ मनपातच नव्हे तर सर्व शासकीय योजनांच्या सेवांवर आकारला जात आहे़ अद्याप त्याबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना मनपाला प्राप्त नसून मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मनपाची नाही़ त्यासाठी स्वतंत्र जीएसटी भवन असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले़ नगरसेवक ईस्माइल पठाण यांनी घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवूनच करसंकलनास सुरूवात करण्यात यावी, अशी मागणी केली़ साबीर सैय्यद यांनी घरकुल योजना, गढूळ पाण्याची समस्या, करवसुलीत होणारा गोंधळ, ४ कोटी रूपयांच्या विशेष रस्ता अनुदानाची फाईल गहाळ झाल्याच्या प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले़ त्याचप्रमाणे सर्व बाजूने मनपाची आर्थिक लूट सुरू असतांना प्रशासनाचे नियंत्रण आहे किंवा नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़  त्यावर विषयनिहाय खुलासा आयुक्त  देशमुख यांनी केला़ परंतु रस्ता अनुदानाची फाईल गहाळ झाल्याच्या मुद्यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही़  कुणाल बियरबारचे अतिक्रमण हटविल्याबद्दल नगरसेवक कमलेश देवरे यांनी आयुक्त व प्रशासनाचे आभार मानले़ दरम्यान, विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करून ते लागलीच मंजूर करण्यात आले़ गुरूवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत देखील जीएसटीवरून ओरड झाली होती़