शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: सावळागोंधळ! धुळ्यात मृत व्यक्तीला दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; कुटुंबीय अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 07:25 IST

देशात जवळपास १०० कोटी जनतेला लसीकरण केल्याचा दावा केला जात असताना आरोग्य विभागाचा लसीकरणाबाबत असलेला सावळागोंधळही चव्हाट्यावर येऊ लागला आहे.

मालपूर(जि. धुळे): देशात जवळपास १०० कोटी जनतेला लसीकरण केल्याचा दावा केला जात असताना आरोग्य विभागाचा लसीकरणाबाबत असलेला सावळागोंधळही चव्हाट्यावर येऊ लागला आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सहा महिन्यांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर त्यांनी १९ ऑक्टोबर २०२१ रोजी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज प्राप्त झाला. या प्रकारामुळे मृताचे कुटुंबीयही अचंबित झालेले असून, लसीकरणाची संख्या वाढविण्याचा हा प्रकार तर नाही ना? अशी चर्चा गावात सुरू झालेली आहे.  येथील बन्सिलाल सुका धनराळे (६६)  यांनी १० मार्च २१ रोजी लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, ६ एप्रिल २१ रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूला सहा महिने झाल्यानंतर बन्सीलाल धनराळे यांनी १९  ॲाक्टोबर २१ रोजी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. त्यांचा मुलगा विनोद धनराळे यांनी मेसेजवरून लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड केले असता, त्यावर दोन्ही डोस घेतल्याच्या तारखा नमूद आहेत. दुसरा डोस त्यांनी मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतल्याचे नमूद आहे. झाली ती चूकच अनावधनाने धनराळे यांचा मोबाईल नंबर टाकला गेला. दुसऱ्या कर्मचाऱ्याने तो व्हेरिफाय केल्याने रजिस्ट्रेशन झाले. झालेली ती चूकच आहे.-डाॅ. हितेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मालपूर

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या