बोराडी येथील ग्राम परिषदेच्या कार्यालयात कोविड-१९ च्या ‘ब्रेक द चेन’ या सुधारित आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम परिषद सरपंच सुरेखा पावरा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उपसरपंच राहुल रंधे, जिल्हा परिषद सदस्य जताबाई पावरा, शिरपूर पंचायत समिती सदस्य सरिताबाई पावरा, ग्रामविकास अधिकारी डी.आर. पेंढारकर, शिक्षण विस्ताराधिकारी आर.के. गायकवाड, जे.पी. जोशी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रमण पावरा, विशाल पावरा, नितीन पाटील, मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य डोंगरसिंग पावरा, पोलीस पाटील अनिल पावरा, राजू सूर्यवंशी, चंद्रकांत वाघ, कविता बडगुजर, सुषमा वाल्हे, सरला पाटील, संदीप पवार, प्रतीश कोळी, शांताराम बिऱ्याडे, अंबादास सगरे, लक्ष्मण गोपाळ, उमेश पावरा, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक वाय.आर. पाटील, विजया पाटील, दिनेश श्रीराव, तसेच आरोग्य, शिक्षण, आशा वर्कर, अंगणवाडी, विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यापुढे उपसरपंच राहुल रंधे म्हणाले की, बोराडी गावात मागील आठ दिवसांतील संपर्कात आलेल्या लोकांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यादी करून स्वॅब घेणे, गावात सलग २ ते ३ दिवस रुग्ण आल्यास स्वॅब कॅम्प घेणे, गावात स्वच्छता, कंटेन्मेंट झोन बोर्ड व आरोग्य सर्वेक्षण, गावात व्यवस्था, होम आयसोलेशनमधील पाॅझिटिव्ह रुग्ण बाहेर न फिरणे, गावात लग्नामध्ये गर्दी न होऊ देणे, मास्कचा वापर याबाबत ग्राम समितीने चोख जबादारी पार पाडावी, तसेच कोरोना महामारीत कर्तव्यावर कसूर करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाईदेखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रमण पावरा, विशाल पावरा, ग्रामविकास अधिकारी डी.आर. पेंढारकर, शिक्षण विस्तार अधिकारी गायकवाड, जे.पी. जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा देशमुख यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. फिल्टर लावण्यात येणार आहे, तसेच सॅनिटायझर, हातातले ग्लोज, गन मशीन आदी साहित्य साहित्य ग्राम परिषद, बोराडी आरोग्य केंद्रास देणार आहे, तसेच लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध पथके तयार करून लोकांच्या मनातील लसीविषयी भीती दूर करून त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी पथके तयार करण्यात आलेली आहेत.
सकाळी ०८.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत फक्त खालील दुकाने सुरू राहतील. यात किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, फळे विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, बेकरी, मिठाईची दुकाने, सर्व प्रकारची खाद्य दुकाने (अंडी, मटन, चिकन, मत्स्य, पोल्ट्री), कृषीसंबंधित सर्व सेवा/दुकाने/उत्पादने, पशुखाद्य विक्री, पाळीव प्राणी यांची खाद्य दुकाने, पावसाळा ऋतूसंबंधित माल व उत्पादने पुरविणारी दुकाने, सदर दुकानांामार्फत घरपोच सेवा पुरविण्यास परवानगी राहील. सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत.
वरील नियम तोडणारे १८९७ मधील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाईस पात्र राहतील याची सर्व दुकानदारांनी नोंद घेण्याचे आवाहन बोराडी ग्राम दक्षता पथक व ग्राम सुरक्षा पथकाने केले आहे.