शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

कोरोनामुळे जीवन जगणे झाले अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:00 IST

संडे अँकर । हमालांची व्यथा, कोरोना आल्यापासून कामांची बोहोनी देखील होत नसल्याची व्यक्त झाली खंत़

दोंडाईचा : कोरोना संचारबंदीत बाजार समिती व इतर ठिकाणी हमालीवर गुजराण करण्याऱ्या हमाल-कष्टकरीचे जीवन जगणे अशक्य झाले आहे. चार-चार दिवस बोहोनोही होत नसल्याने खायचे काय? एवढे कठीण दिवस कधीही पाहिले नाहीत, कसे-बसे जीवन जगत असल्याची व्यथा हमाल बांधवांनी मांडली.कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केल्याने लहान विक्रेत्याचेही हाल झालेत. अनेकांचे व्यवसाय बंद झाले. हातावर पोट भरणाºया हमालांचे सर्वाधिक हाल झालेत. सुमारे १३५ दिवस झाले असून अजूनही कोरोना संसर्ग कमी व्हायला तयार नाही. अशा परिस्थितीत दोंडाईचा शहरातील हमाली करून गुजरान करणाºया हमालांची स्थिती हलाखीची झाली आहे. दोंडाईचा शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती व स्टेशन भागातील महादेव मंदिर म्हणजे पार ओटा या ठिकाणी हमाल बांधव लोटगाडी घेऊन थांबलेले असतात.कोरोनामुळे शासनाने संचारबंदी घोषित केली. नंतर जनता कर्फ्यू, नंतर दोंडाईचा बंद, पुन्हा पाच दिवसांचा दोंडाईचा जनता कर्फ्यूमुळे बाजार समिती बंद होती. सुरुवातीचे काही दिवस जीवनावश्यक वस्तू सोडता सर्वच दुकाने बंद आदींमुळे हमाल बांधवांना हमाली मिळणे मुश्किल झाले. आर्थिक दु:ख विसरण्यासाठी काही हमाल व्यसनाधीन झालेत. कोणीतरी येईल आपल्याला साहित्य नेण्यास सांगून हमाली देईल अशा केविलवाणी नजरेने हमाल येणाºया जाणाºयाचे निरीक्षण करतात़सद्य परिस्थितीत बाजार समिती बंद आहे. मार्केट सुरु होते तेव्हा हमाली ४०० ते ५०० रुपये मिळत होती़ आता जेमतेम ५० रुपये मिळतात, तर कधी - कधी बोहोनीही होत नाही. अशा विपरीत परिस्थितीत घर कसे चालवायचे? असा प्रश्न हमाल बांधव पुढे पडला आहे.डोळ्यात अश्रू आले़़़कोरोनामुळे दोंडाईचातील हमाल बांधवाची आर्थिक परिस्थिती चांगलीच हलाखीची झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून हमाली करीत असून एवढे वाईट दिवस कधीच पाहिले नाहीत, तेवढे वाईट दिवस कोरोनामुळे आलेत. अशी आपबीती सांगताना महेश पारधीच्या डोळ्यात अश्रु तरळलेत. कोरोना मुळे सर्वच हमाल बांधवांची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाने सर्वच सर्वस्व गमाउन बसल्याने घर खर्च कसा करावयाचा असा प्रश्न पडल्याचे हमालांनी सांगितले.कोरोना मुळे आमचे जगणे असह्य झाले आहे. दिवसाला ३०० ते ४०० रुपये हमाली मिळायची, आता जेमतेम ५० रुपये मिळतात. कधी कधी चार चार दिवस बोहोनीही होत नाही़ अशा विपरीत परिस्थितीत आम्ही खायचे काय? घर खर्च कसा करावयाचा? शासनाने आम्हास आर्थिक मदत घ्यावी़- नाना पवार, दोंडाईचा

टॅग्स :Dhuleधुळे