धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना होत आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी मनपा आरोग्य विभागाकडून जिल्हा कारागृहातील २८८ बंदिवानांची कोरोनाची तपासणी करण्यात आली़जिल्हा कारागृहात महापालिका व धुळे जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना तपासणी करण्यात आली़ यावेळी मनपा स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, आयुक्त अजिज शेख, मनपा आरोग्य अधिकारी डॉ़ महेश मोरे आदी उपस्थित होते़ यावेळी २६६ पुरुष, २० महिला बंदिवान तसेच त्यांच्यासोबत असलेले २ लहान मुलं असे एकूण २८८ जणांची थर्मल स्कॅनद्वारे यांच्या शरीरातील तापमानाची थर्मल स्कॅनद्वारे तपासणी करण्यात आली़ त्यांनतर कारागृह कर्मचारी त्यांचा परिवाराची तपासणी करण्यात आली. शरीराचे तापमान सामान्य असल्याचं या थर्मल स्कॅन तपासणीत आढळले अशी माहिती कारागृहाच्या वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपा आगे यांनी दिली़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुरुंगाधिकारी आगे, एऩ एम़ कन्नेवाड, मनोहर सुर्यवंशी, उमेश पाटील, डी़जीग़ावडे, नेहा गुजराथी, छाया पाटील, शिवाजी जायभाये, चंद्रभान महाले, हेमंत पोतदार आदीनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले़शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विविध उपाय-योजना केल्या जात आहे़ कारागृहात देखील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बंदिवानांना कोरोनाची माहिती, वैद्यकीय तपासणी, दक्षता घेण्याबाबत जनजागृती काय उपाय-योजना करावे अशी माहिती दिली़
मनपाकडून २८८ बंदिवानांची कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:57 IST