लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. गुरुवारी आणखी २२२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, धुळे तालुक्यातील मुकटी व शिंदखेडा येथील पुरुष तसेच दोंडाईचा येथील महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत १५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.गुरुवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ९६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील ३६, शिंदखेडा तालुक्यातील ५१, शिरपूर तालुक्यातील ३३ व साक्री तालुक्यातील सहा रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ५००८ इतकी झाली आहे.
कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ५००८ वर पोहोचली गुरूवारी २२२ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 21:51 IST