शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

स्टेशनरी व्यवसायाला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 21:53 IST

दोंडाईचा : सुमारे १ कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प

दोंडाईचा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीत-संचारबंदीत शाळा, महाविद्यालय २२ मार्चपासून बंद आहेत. त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यातच सुरू झालेले आॅनलाइन शिक्षण मुळे पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदीकडे पाठ फिरवली आहे. कोरोनाची वाढती बाधा, त्यातून शिक्षणावर आलेले अनिश्चितेचे निर्माण झालेले सावट यामुळे दोडाईचात स्टेशनरी बाजारात सुमारे १ कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याची माहिती दुकानदारांनी लोकमतला दिली.कोरोनामुळे प्राथमिक,माध्यमिक व महाविद्यालय मार्च पासून बंद आहेत. परीक्षेला लागणारे साहित्य पण पडून आहे . विविध शासकीय कार्यालयात पण स्टेशनरी कमी लागली. विद्यार्थ्यांचा सुटीचा मधला काळ सोडला तर एप्रिल ते जुलै हा काळ स्टेशनरी विक्रीसाठी दुकांदारासाठी महत्वाचा आहे.परंतु अद्यापही शाळा-महाविद्यालय सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे.शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थ्यांसाठी पेन, वही, गोंद, वॉटरबॅग,तप्तर,रजिस्टर, भौमितिक साहित्य पेटी,इंजिनिअरिग शीट, ड्रॉईंग पेपर, पेन्सिल, रंग, विविध प्रकारच्या फाईल,आलेख-प्लॅन कागद,रजिस्टर, गाईड,रबर ,लिफापा आदी १०० प्रकारचे शैक्षणिक साहित्य स्टेशनरी दुकानातून विक्री होते.दोडाईचात सुमारे १५ स्टेशनरी दुकाने आहेत. या स्टेशनरी दुकानातून प्रत्येक वर्षी स्टेशनरी विक्री होते. काही किराणा दुकानातूनही स्टेशनरी विक्री केली जाते. दोंडाईच्यात मुंबई, पुणे, नागपूर,जळगाव, धुळे आदी ठिकाणाहून स्टेशनरी मागविली जाते. अद्यापही शाळा- महाविद्यालय सुरू होण्याचे निश्चित नसल्याने शैक्षणिक साहित्य विक्री रोडावली आहे. पालक साहित्य घेत नसल्याने दुकानात शांतता दिसते. दोडाईचात मराठी-इंग्रजी माध्यमाचा प्राथमिक, माध्यमिक शाळा, दोन महाविद्यालय, कृषी महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शैक्षणिक साहित्य लागते. यात किमान एक कोटी रुपयांची उलाढाल होते. ती उलाढाल ठप्प झाल्याची माहिती मिळाली आहे. शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यावरच शैक्षणिक साहित्य विक्री वाढणार असल्याचे दुकानदारांनी सांगितले. दरम्यान दुकानदारांनी शैक्षणिक साहित्याचे दर वाढविल्याने ग्राहक पण नाराज दिसतात. बाहेरगावातील काही होलसेल व्यापाऱ्यांनी शैक्षणिक साहित्य पाठवून दिले. पण त्यास मागणी नसल्याने पैसे नाहीत, त्यामुळे छोटे विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. होलसेल व्यापाऱ्यांचे मालाचे पैसे,बँक हप्ते,दुकानाचे भाडे कसे द्यायचे,याचा प्रश्न येथील दुकानदारांंना पडला आहे