शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कोरोनामुळे डीजे, मंडप डेकोरेटर्सचा वाजला ‘बॅण्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

शिरपूर : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन जाहीर ...

शिरपूर : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्याने लग्नसोहळ्यावर विरजण पडले आहे़ शासनाच्या निर्बंधामुळे मोठ्या थाटात लग्नसोहळा करता येणार नसल्याने वधू-वरांचा हिरमोड झाला असून, लॉकडाऊनमुळे अनेक जणांचे रोजगार हिरावले आहेत़

आयुष्यातील आनंदाच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या लग्नसोहळ्यात सहसा कुणीही तडजोड करीत नाहीत, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्नसोहळ्यावर अनेक मर्यादा आल्याने संबंधित व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत़ शहरात १४ मंगल कार्यालये असून सध्या ते ओस पडले असल्याचे चित्र आहे़ लग्न व धार्मिक कार्यक्रम नसल्याने शहरासह तालुक्यात अंदाजे शंभरापर्यंत मंडप डेकोरेटर्स व साऊंड सिस्टिमचा आवाज बंद झाला आहे़

शासन दरबारी मागणी करूनही काहीच होत नसल्याने संबंधितांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे़ कडक निर्बंधांमुळे तालुक्यातील अंदाजे ५० च्या आसपास डीजे व बॅण्ड व्यावसायिकांचा यामुळे बॅण्ड वाजल्याने व्यवसायाशी निगडित कामगार हवालदिल झाले आहेत. लग्नाच्या जेवणाची ऑर्डर ५० लोकांचीच असल्याने आचारी व वाढपीचा खर्चही निघत नसल्याने केटरर्स व्यावसायिक व त्यांचे कामगार अडचणीत सापडले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे एप्रिल-मे मधील शुभमंगल रद्द करण्यात आले आहेत़ मुहूर्त आणि गौण तिथी अशा दोन मुहूर्तांवर अनेकांनी लग्नाचे बेत आखले होते़ मात्र ही वेळ सावधगिरी बाळगण्याची असल्याचे सांगत वर-वधू पक्षांनी एप्रिलमधील लग्नसमारंभ रद्द केले आहेत़ त्यामुळे मंगल कार्यालयातील लग्नाच्या तारखा रद्द करण्यात आल्याचे मंगल कार्यालय मालकांना कळविण्यात आले आहे़

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ तालुक्यात दररोज ५० पेक्षा अधिक रुग्ण कोरोनाचे आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे़

विवाह मुहूर्त (गौण व शुभ)

एप्रिल : १, ३, ५, ६, ७, १७, २२, २४, २५, २६, २८, २९, ३० (१३ मुहूर्त)

मे : १, २, ३, ४, ५, ८, १३, १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ (१६ मुहूर्त)

जून : ४, ६, १३, १६, २०, २६, २७, २८ (८ मुहूर्त)

मंगल कार्यालयातील नियम

लग्नसोहळ्यासाठी शासनाने सुरुवातीला ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घातली होती़ त्यानंतर प्रादुर्भाव वाढल्याने ब्रेक द चेनच्या नव्या नियमांनुसार विवाह समारंभासाठी केवळ २५ जणांनाच उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे़ याबरोबरच मंगल कार्यालयाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे़ लसीकरण न झाल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे़ दोन्ही प्रमाणपत्रे नसल्यास १ हजार रुपये दंड व मंगल कार्यालयाच्या मालकास १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल़ अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास आस्थापना बंद करण्यात येईल़

आर्थिक उलाढाल ठप्प

लग्नसोहळ्याशी संबंधित असलेले सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत़ पर्यायाने मंगल कार्यालये, वाजंत्री, आचारी आदींसह अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे़ यातील अनेकजण लग्नाच्या मुहूर्तातील कमाईवरच वर्षभराची गुजराण करीत होते़

विवाह लांबणीवर

एप्रिल महिन्यात दरवर्षी लगीनघाई सुरू असते़ यंदाही सुमारे १३ शुभमुहूर्त या महिन्यात होते़ मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर राज्यभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी हे सोहळे लांबणीवर टाकले आहेत़

वर्षभरात ६० लग्नतिथी

सन २०२० मध्ये वर्षभरात ६० लग्नतिथी होत्या़ मात्र लॉकडाऊनमुळे विवाहसोहळ्यांवर विरजण पडल्यामुळे काहींनी धूमधडाक्यात करू या अपेक्षेने अंगाला हळद लावली नाही़ त्यांना हेही वर्ष पावणार नसल्यामुळे दिवाळीपर्यंत वाट पहावी लागणार आहे़ असे असले तरी काहींनी शासनाच्या नियमांचे पालन केल्यामुळे गेल्या वर्षी तालुक्यात १४० ते १५० विवाह सोहळे पार पडले होते.

२०२१ ला उडाले बार

सन २०२१ च्या जानेवारी ते मार्चअखेर एकूण १९ लग्न मुहूर्त होते़ जानेवारीत अनेकांच्या लग्नात बॅण्ड होता. या ३ महिन्यात विवाह सोहळ्यांना मोकळीक मिळाल्यामुळे ७०-८० विवाह झाले आहेत़ कोरोनाची भीती काढून मोठमोठाले लग्न लावल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन लागल्यामुळे सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली़

एका लग्नावर अनेक व्यावसायिक अवलंबून असतात़ परंतु ऐन लग्नसराईत दुसऱ्या वर्षीच्या कडक निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने शासनाने कारागिरांच्या उदरनिर्वाहासाठी मदत जाहीर करावी़ अजून किती दिवस लॉकडाऊन राहणार हे माहीत नसल्याने अनेक जण अडचणीत आले आहेत़

- चंद्रकांत पाटील

सम्राट मंडप अ‍ॅण्ड डीजे, शिरपूर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्नसोहळ्यांना परवानगी नाकारली आहे़ त्यामुळे भाडे कराराने घेतलेल्या मंगल कार्यालयाचे भाडे कसे दिले जाईल, याची चिंता लागली आहे़

- सचिन जैन, शिरपूर