नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व पटवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:43+5:302021-02-26T04:49:43+5:30

धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघाच्या डिजिटल वेबसाईट व ॲपचे उद‌्घाटन आप्पासाहेब साळुंके यांच्या हस्ते करण्यात झाले, त्यावेळी ते बोलत ...

Convince the new generation of the importance of education | नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व पटवून द्या

नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व पटवून द्या

googlenewsNext

धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघाच्या डिजिटल वेबसाईट व ॲपचे उद‌्घाटन आप्पासाहेब साळुंके यांच्या हस्ते करण्यात झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महासंघाचे महासचिव रा. ना. सोनव, पंकज पवार, राज्य उपाध्यक्ष बापू पारधी, समाधान साळुंके, रमेश चव्हाण, धुळे, सखुबाई विजय पवार, जिजाबाई भाईदास पारधी, पी. के. पारधी, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, भिका रायसिंग सोनवणे, महिला राज्य उपाध्यक्ष रत्ना अशोक चव्हाण, प्रशांत गोकुळ दाभाडे उपस्थित होते.

यावेळी धुळे जिल्ह्यातील पारधी समाजातील नवनिर्वाचित उपसरपंच रुखमाबाई चिमाजी चव्हाण - शिरुड, ग्रामपंचायत सदस्य रंजनाबाई हिलाल पारधी - लंघाणे, राजकोरबाई मच्छिंद्र पवार - बोरीस, रेखाबाई धाकू सूर्यवंशी वायपूर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच धुळे जिल्हा नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष बापू पारधी यांनी प्रास्ताविक केले. महासचिव रा. ना. सोनवणे यांनी यापुढे असे जास्तीत जास्त सदस्य निवडून यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण, रवींद्र चव्हाण, जगदीश शिंदे, मंगलसिंग पवार, हेमराज पवार, दादाजी चव्हाण, हिरालाल पवार, रजेसिंग शिसोदे, विकास दाभाडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्योती चव्हाण यांनी केले. नगराज सोळंकी यांनी आभार मानले.

Web Title: Convince the new generation of the importance of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.