शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

धुळे जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम अवघे २० टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 14:18 IST

रेती, पाण्यामुळे बांधकामावर होतोय परिणाम

ठळक मुद्दे२०१२-१३ मध्ये जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ८६९ कुटुंबाचा सर्वे करण्यात आलामार्च २०१८ मध्ये धुळे जिल्हा प्रशासनाच्यादृष्टीने हगणदारीमुक्त झाला.२०१९-२० या वर्षासाठी १४ हजार ५८ वैयक्तीक शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट

आॅनलाइन लोकमतधुळे : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात २०१८-१९ या आर्थिक वर्षात १७ हजार ५२२ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी अवघ्या ३ हजार ४६४ जणांनीच शौचालय बांधले असून, त्याची टक्केवारी अवघी १९.७६ टक्केच असल्याचे या विभागाच्या संकेतस्थळावर भरण्यात आलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. दरम्यान २०१९-२० या वर्षासाठी आता १४ हजार ५८ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.२०१२-१३ मध्ये जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ८६९ कुटुंबाचा सर्वे करण्यात आला होता. त्यात फक्त ५२ हजार ५२४ जणांकडे वैयक्तिक शौचालये असल्याची बाब समोर आली होती. यात सर्वाधिक वैयक्तिक शौचालये बांधकाम धुळे तालुक्यात झालेले होते. या तालुक्यात १८ हजार ५६६ जणांनी शौचालये बांधलेले आढळले. त्याखालोखाल साक्री तालुक्यात १४ हजार ७१०, शिरपूर तालुक्यात १० हजार ५१६ तर सर्वात कमी शिंदखेडा तालुक्यात ८ हजार ७५८ वैय्यक्तीक शौचालये बांधलेले होते.२०१३-१४ पासून ही योजना जिल्ह्यात राबविण्यास सुरूवात झालेली आहे. पहिल्यावर्षी जिल्ह्यात ९४२ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. यात धुळे, साक्री, शिरपूर तालुक्यात प्रतिसाद चांगला असतांना शिंदखेडा तालुक्यात अवघे एक वैयक्तिक शौचालये बांधण्यात आले होते.२०१४-१५ यावर्षात मात्र या योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. या वर्षात ८५२२ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. त्यात धुळे तालुक्यात २४०६, साक्री तालुक्यात २३३७, शिंदखेडा तालुक्यात १७०१ तर शिरपूर तालुक्यात २०७८ शौचालये बांधण्यात आले.१५-१६ या वर्षात हीच संख्या २८४२४ पर्यंत गेली. तर १६-१७ मध्ये ५० हजार ३३ शौचालयांचे बांधकाम झाले.जि.प. प्रशासनाला २०१७-१८ या वर्षात १ लाख ०४ हजार ८८२ वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट होते. यापैकी १७ हजार ५२२ कुटुंबाकडे वैय्यक्तीक शौचालये नव्हते. मात्र ते सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत असल्याचे आढळून आले. मार्च २०१८ मध्ये धुळे जिल्हा प्रशासनाच्यादृष्टीने हगणदारीमुक्त झाला.दरम्यान २०१८-१९ या वर्षासाठी जिलाला १७ हजार ५२२ वैयक्तिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यापैकी फक्त ३ हजार ४६४ वैयक्तीक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. त्याची टक्केवारी अवघी १९.७६ टक्के एवढी आहे. आता २०१९-२० या वर्षासाठी १४ हजार ५८ वैयक्तीक शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे