शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

राष्ट्रवादी पक्ष निरीक्षकांसमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची अनुपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 22:15 IST

राष्ट्रवादी काँग्रेस भवन : पक्षाच्या संघटन बांधणीबाबत बंद खोलीत चर्चेची नामुष्की, गट-तटाचे उमटले प्रतिबिंब

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भवनात पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठकीपुर्वीच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला़ पक्ष आम्हाला विश्वासात घेत नाही़ जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना विचारात घेतले जाते असा आरोप केल्याने निरीक्षकांना पदाधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा करण्याची वेळ आली़ दरम्यान, बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली़राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या संघटन बांधणी संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यासाठी निरीक्षक तथा सरचिटणीस अविनाश आदिक, अर्जुन टिळे हे शहरात आले होते. बºयाच प्रतिक्षेनंतर निरीक्षक दाखल झाल्यानंतर अनेकांकडून घोषणाबाजीही केली गेली. एकूणच सर्व गोंधळाची स्थिती याठिकाणी दिसून आली. त्यामुळे निरीक्षक अर्जुन टिळे यांनी माईकचा ताबा घेत बैठकीऐवजी आपण बंद दालनात कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेवू, असे स्पष्ट करीत सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर गटागटांना दालनात बोलवून त्यांच्याशी निरीक्षकांनी चर्चा केली. त्यात सुरूवातील पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी यांना बोलविले गेले. त्यानंतर महिलांना संधी देण्यात आली. दिवसभर गटागटांना दालनात बोलवून निरीक्षकांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्यात. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये नव्याने केलेल्या नियुक्तीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक वर्षापासून पक्षाचे काम करणाऱ्यांना डावण्यात आल्याचा आरोप पदाधिकाºयांनी केला. बराच वेळ गोंधळाची स्थिती कायम होती़ अशातच बैठक उरकण्यात आली़यावेळी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, रणजित भोसले, किरण पाटील, चंद्रकांत केले, अनिल मुंदडा, एन. सी. पाटील, विनायक शिंदे, पोपटराव सोनवणे, कैलास चौधरी, संदिप बेडसे, सत्यजित सिसोदे, डॉ़ जितेंद्र ठाकूर, रामकृष्ण पाटील, जितू शिरसाठ, रईस काझी, हेमंत मदाने, ज्योती पावरा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़अनिल गोटेंची अनुपस्थिती लक्षवेधीपक्ष निरीक्षकांच्या समवेत बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली़ यासंदर्भात गोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बैठकीत मी जाणार नाही असे सर्व वरिष्ठांना मी यापुर्वीच सांगितले होते़ जेणे करुन वाद होणार नाही आणि कार्यकर्त्यांना मनमोकळे बोलता येईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली़राष्ट्रवादी भवनात झालेल्या पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही़ - किरण शिंदे, जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Dhuleधुळे