लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : केंद्र सरकार पुरस्कृत माहिती संप्रेषण तंत्रज्ञान योजनेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील आठ हजार पूर्वरत कंत्राटी संगणक शिक्षक व निर्देशक यांना मानधन तत्त्वावर सेवेत सामावून घ्यावे या मागणीचे निवेदन शिक्षक व काँग्रेसतर्फे देण्यात आले.११ रोजी मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांना राज्य काँग्रेस प्रदेशचे सरचिटणीस प्रा.प्रकाश सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, आय.सी.टी. संगणक शिक्षक संघटना प्रतिनिधी अकिल शहा (धुळे), गोरख व्यवहारे (नाशिक), भगवान जगताप (मालेगाव) आदी शिक्षकांच्या वतीने हे देण्यात आले.या वेळी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्यावतीने शिक्षणमंत्री यांनी या संदर्भात तात्काळ बैठकीचे आयोजन करावे, अशा शिफारशीचे पत्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविण्यात आले.
संगणक कंत्राटी शिक्षकांना मानधन तत्त्वावर सामावून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:12 IST