शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

धुळे तालुक्यातील विद्यार्थिनींची मोफत पास मिळत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 15:22 IST

जिल्हाधिकाºयांची घेतली भेट, विद्यार्थिनींनी मांडली कैफियत

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून पास मिळत नसल्याची तक्राररोज पैसे खर्च करून शहरात येणे अवघडजिल्हाधिकाºयांनी समजून घेतली समस्या

आॅनलाइन लोकमतधुळे : ग्रामीण भागातून शहरात शिक्षणाला येणाºया विद्यार्थिनींना धुळे आगारातर्फे गेल्या दोन महिन्यांपासून मोफत पास दिले जात नसल्याची कैफियत विद्यार्थिनींनी आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासमोर मांडली. जिल्हाधिकाºयांनीही प्रत्येक विद्यार्थिनीची समस्या ऐकून घेतली.  दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी शहरात येत असतात. शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाºया आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना मानव विकास योजनेंतर्गत तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर  योजनेंतर्गत मोफत पास दिला जातो. असे असले तरी धुळे आगारातर्फे पास देतांना आडमुठे धोरण अवलंबिले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना मोफत पास देण्यात आलेले नाहीत.  या संदर्भात शाळेच्या शिक्षकांनी विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, धुळे आगार प्रमुख भगवान जगनोर यांच्याशी वारंवार संपर्क साधला, प्रत्यक्ष भेट घेतली. मात्र त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे जवळपास ९२ विद्यार्थिनींनी आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी मोजक्या लोकांना भेटतात, त्यांचे निवेदन स्वीकारतात. मात्र जिल्हाधिकाºयांनी आज सर्व विद्यार्थिनींना आपल्या दालनात प्रवेश दिला. जिल्हाधिकाºयांनी प्रत्येक विद्यार्थिनी कोणत्या गावाहून येते, तिची समस्या काय आहे हे जाणून घेतले. या विद्यार्थिनींनी मोफत  पासची कैफियत जिल्हाधिकाºयांसमोर मांडली.या विद्यार्थिनींसमवेत माजी आमदार शरद पाटील,  प्रा. अरविंद जाधव, प्रा. दर्शना पाठक, प्रा. दिपाली दाभाडे उपस्थित होत्या.  

टॅग्स :Dhuleधुळे