धुळे : बंदचे आदेश देवूनही गोंदूर रोडवरील हॉटेल सुरु असल्याने त्याच्या मालकाविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला़कोरोना या विषाणू व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे़ त्याला पायबंद बसावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व हॉटेल्स, चहाची टपरी, पान टपरी बंद ठेवण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत़ तरी देखील काही ठिकाणी हॉटेल सुरु असल्याचे पोलिसांच्या तपासणीतून समोर आले़ पश्चिम देवपूर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गोंदूर रोडवरील प्यासा डी लाईट ही हॉटेल सुरु होती़ पोलिसांनी या ठिकाणी जावून तपासणी केली असता हॉटेल नेहमी प्रमाणे सुरु होती़ त्यामुळे हॉटेलचे मालक सागर मोहन मानगुळकर (३५, रा़ शांतीनिकेतन सोसायटी, देवपूर) याच्या विरोधात पोलीस कर्मचाºयाने फिर्याद दाखल केल्याने भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़ सहायक पोलीस उपनिरीक्षक बी़ आऱ पिंपळे घटनेचा तपास करीत आहेत़
धुळ्यात हॉटेल मालकाविरुध्द गुन्हा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 21:19 IST