शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात १२ हजार मतदारांचे अर्ज संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:21 IST

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम : आॅनलाइन नोंदणीला मतदारांचा प्रतिसाद; बीएओंनी दिल्या २ लाख गृहभेटी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची नाव नोंदणी, वगळणी व दुरुस्ती करण्याच्या कामासाठी बीएलओंनी गृहभेटी द्याव्यात, असे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार  या कार्यक्रमांतर्गत १ आॅक्टोबर ते ११ डिसेंबर याकालावधीत बीएलओंनी जिल्ह्यात १२ हजार २५० मतदारांचे अर्ज संकलित केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत  आॅनलाइन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ३ हजार ५४५ मतदारांनी आॅनलाइन पद्धतीने तर आॅफलाइन ८ हजार ७०५ मतदारांचे अर्ज बीएलओंनी गृहभेटींद्वारे  संकलित केल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. दरम्यान, प्राप्त अर्जांची डाटा एन्ट्री ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले होते. सुरुवातीला हा कार्यक्रम १ ते ३१ आॅक्टोबर याकालावधीसाठी होता. परंतु, निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम १५ डिसेंबरपर्यंत सुरू ठेवावा, असे सांगितले होते. मात्र, त्यानुसार उद्या, शुक्रवारपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे. अंतिम दोन दिवस विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हा १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या मतदारांची नावे ही मतदार यादीत नाही; किंवा मतदार यादीतील नावे दुरुस्त करायची आहे, त्यांनी दोन दिवसात बीएलओंशी संपर्क साधून नाव नोंदणी, दुरुस्ती करून घ्यावी; असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.  शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील बीएलओ हे त्यांनी केलेल्या कामाचे दप्तर  हे जिल्हा निवडणूक शाखेत सादर करणार आहेत. शिक्षक मतदार नोंदणीसाठी २१ डिसेंबरपर्यंत मुदत भारत निवडणूक आयोगाने जुनी शिक्षक मतदार यादी रद्द करून नव्याने शिक्षक मतदार यादी तयार करावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात ७ हजार ४२४ शिक्षकांनी नोंदणी केली होती. त्यानुसार २१ नोव्हेंबरला शिक्षक मतदार संघाची प्रारूप मतदार यादीही प्रसिद्ध झाली होती. मात्र, त्यानंतर शिक्षक मतदारांना नाव नोंदणीसाठी आयोगाने पुन्हा २१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने जिल्ह्यात १९४ शिक्षकांनी नोंदणी केली आहे. 

१,६३० बीएलओंनी २ लाख घरांना दिल्या भेटी 

४मतदारांची नाव नोंदणी, दुरुस्ती, मयत मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी जिल्ह्यातील १,६३० बीएलओंनी ११ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ३८ हजार २२६ मतदारांच्या घरी भेटी दिल्या.४ त्यानुसार ज्या मतदारांचे नाव यादीत नाही; अशा १० हजार १३ मतदारांची नावे संकलित करून घेतली. ४या नावांपैकी २ हजार ६८७ नावे ही बीएलओंनी ‘बीएलओ अ‍ॅप’ या माध्यमातून तर उर्वरीत ७ हजार ३२६ नावे ही प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेटी देऊन संकलित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.