शाळांच्या निर्णयाची अजूनही प्रतीक्षाच
धुळे : शहरातील काही शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने महानगरातील शाळा १५ दिवसांपासून बंदच आहेत. जनता कर्फ्यूमुळे शाळा बंदच्या मुदतीत दोन दिवस वाढ झाली होती; मात्र जनता कर्फ्यूची मुदत संपली तरी अद्यापही शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेलाच नाही.
जुन्या मनपासमोर
खड्डेच खड्डे
धुळे : जुन्या महानगरपालिकेसमोरील रस्ता खड्डेमय झालेला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. शहरातील रस्त्यांची जबाबदारी असणाऱ्या कार्यालयाजवळ एवढे खड्डे असतील तर इतर रस्त्यांचा विचार न केलेलाच बरा.
एस.टी.बसेसचीही तपासणी करावी
धुळे : धूर सोडून प्रदूषणात भर टाकणाऱ्या खासगी वाहनांना लागलीच पीयुसी करण्यास भाग पाडले जाते. त्याचप्रमाणे एस.टी. महामंडळांच्या अनेक बसेस या धूर सोडत असतात. त्यामुळे प्रदूषणात भर पडत असून, अशा बसेसचीही तपासणी करण्याची गरज आहे.