शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात सालटेक, पेरेजपूरला ढगफुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:09 IST

प्रशासनाचा नकार, शेती, कांदा व विहिरींचे प्रचंड नुकसान 

ठळक मुद्देदोन वर्षापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती दुपारी तासभर सलग जोरदार पाऊस नुकसानाच्या पंचनाम्याचे प्रशासनाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील सालटेक, पेरेजपूर परिसरात रविवारी दुपारी झालेल्या ढगफुटीच्या घटनेने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने कांदा चाळींसह शेतपिके व विहिरींचा समावेश आहे. प्रशासनाने ढगफुटी झाली यास दुजोरा दिलेला नाही. मात्र ढगफुटीत होणारा कमी वेळेत जास्त पाऊस येथे झाला आहे. दुपारी तासाभरात सलग हा पाऊस झाला.या संदर्भात हवामानशास्त्र विभागाने इशारा दिलेला होता. त्यात गुजरात राज्यास लागून असलेल्या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली होती. प्रशासनालाही याबाबत माहिती होती. परंतु त्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी अतिवृष्टी होईल, याचा उल्लेख केलेला नव्हता, अशी माहिती साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यांनी ढगफुटी नाही; पण त्यासदृश्य हा पाऊस असल्याचेही सांगितले. कांदा चाळी उदध्वस्त; परिसरातील विहिरी बुजल्यारविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. सलग परंतु संथ स्वरुपात हा पाऊस बरसला. तासाभरात अतिवृष्टी झाल्याने सालटेक, पेरेजपूर परिसरात असंख्य कांदाचाळींची दाणादाण उडाली. कांदे पाण्याने भिजले असून सडण्याची शक्यता आहे. तर पडणाºया पावसाचे पाणी वाट फुटेल, त्या बाजूला वाहिल्याने नाल्यासह कान नदीला मोठा पूर आला. तसेच शेतांमधूनही पाणी वाहिल्याने जमिनीवरील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. शेतविहिरींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक विहिरी बुजल्या गेल्या असून ऐन खरिपाच्या हंगामात शेतक-यांच्या पुढे मोठे संकट उभे राहिले आहे. पंचनाम्याच्या आदेशाने दिलासा ढगफुटीच्या घटनेबाबत कळताच तालुक्याचे तहसीलदार संदीप भोसले  यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संपूर्ण परिसरात पाहणी केली. शेतकरी, ग्रामस्थांशीही संवाद साधला.   कमी वेळेत जास्त पाऊस बरसून नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. सोमवारीही तहसीलदार भोसले कर्मचा-यांसह त्या परिसरात जाणार असून नुकसानाचा अंदाज घेणार असल्याचे सांगण्यात आले. दोन वर्षांपूर्वीही झाला होता असाच पाऊस सालटेक, पेरेजपूर ही गावे एकमेकांच्या जवळ आहेत. पेरेजपूर खाली तर या गावाजवळ असलेल्या टेकडीच्या वर सालटेक वसले आहे. दोन वर्षांपूर्वीही याच ठिंकाणी असाच ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. दोन वर्षांनंतर या घटनेची पुनरावृत्ती झाली. दोन वर्षांपूर्वी तालुक्यात कुठेही पाऊस होत नव्हता. परंतु या ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला होता.  दोन वर्षांपूर्वी घटबारी धरण फुटले होते, त्यास कारणही तोच पाऊस होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या परिसराचे भौगोलिक स्थान वैशिष्टपूर्ण असून त्यामुळेचा असा ढगफुटीसारखा पाऊस होत असल्याची चर्चा आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेRainपाऊस