शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दूध वाटप करणाऱ्यांवर कारवाई करा; धुळे शहरातील नागरिकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 19:53 IST

बनावट दूध वाटप करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धुळे शहरातील नागरिकांनी केली आहे. 

धुळे : शहर आणि जिल्ह्यात बाहेरून येणारे भेसळ केलेले किंवा बनावट दूध वाटप करणारे आणि ते तयार करणारे यांच्याविरोधात एसआयटी नेमून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.

धुळे शहरात आणि जिल्ह्यात भेसळ केलेल्या दूध विक्रीचा धंदा तेजीत सुरू आहे. बाहेरून येणाऱ्या दुधात भेसळ केलेली असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. धुळ्यात येणाऱ्या दुधात किती  शुद्ध आणि किती भेसळ आहे, हे तपासण्यासाठी पोलिस, क्वाॅलिटी कंट्रोल अधिकारी, शासकीय दूध डेअरी अधिकारी, कृषी महाविद्यालयातील डेअरी विभागातील तज्ज्ञ प्राध्यापक, अन्न-औषध प्रशासनाचे अधिकारी, ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य यांची एक समिती स्थापन करून शहरात आणि जिल्ह्यात येणारे दूध तपासून भेसळ करणारे आणि विक्री व वितरित करणाऱ्या लोकांची तपासणी करावी आणि भेसळ किंवा बनावट दूध आढळल्यास दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य डॉ. योगेश हिंमतराव सूर्यवंशी, दिनेश सुभाष रेलन, जगदीश बोरसे, आदींनी केली आहे.

 

टॅग्स :Dhuleधुळे