शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

रस्ता लुटमारीमुळे नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:49 IST

नंदुरबार : लूटमारीच्या एकापाठोपाठच्या घटनांमुळे शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नंदुरबार : लूटमारीच्या एकापाठोपाठच्या घटनांमुळे शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तर उपनगर ठाण्याच्या हद्दीत लागोपाठ दोन घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे तिन्ही घटनांमध्ये दोन मोटारसायकलींवर आलेल्या युवकांनी हे कृत्य केले असून त्यांचे वर्णनदेखील एकसारखेच असल्यामुळे या टोळीला जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

नंदुरबारातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रोअॅक्ंिटग पोलीस हा उपक्रमदेखील त्यातीलच एक. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांसोबत हत्यारधारी पोलिसांची देखील नेमणूक आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसून अप्रिय घटना कमी झाल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. भर चौकात आणि भर रस्त्यांवर लुटमारीच्या लागोपाठच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

भर चौक व रस्त्यातील घटना

नंदुरबारातील महाराणा प्रताप चौकात भर दिवसा सातारा जिल्ह्यातील पर्यटकांना लुटण्यात आले. प्रकाशा येथे देवदर्शनासाठी आलेले भाविक परत जात असताना चहा पिण्यासाठी बसस्थानकासमोरील महाराणा प्रताप चौकात एका चहाच्या हॉटेलवर थांबले असताना अचानक दोन मोटारसायकलींवर आलेल्या युवकांनी त्यातील चालकाचे पाकीट बळजबरीने हिसकावले. कारमधील इतर तिघांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रय} केला असता त्यांनाही धमकावून ते पसार झाले होते.

दुसरी घटना सिंधी कॉलनीच्या पुढे निझर रस्त्यावर घडली. नंदुरबारातील व्यापारी कैलास नारायणदास तेलवाणी हा युवक आपल्या मोटारसायकलीवरून सिंधी कॉलनीतून निझर रस्त्याने जात असताना पेट्रोलपंपाच्या पुढे त्याला मोटारसायकलस्वार तीन युवकांनी अडविले. त्याच्या मोटारसायकलीचा हेडलाईट फोडून त्याला धमकावून त्याच्या खिशातील रक्कम मागणी केली. परंतु त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याचा किंमती मोबाइल घेऊन ते पसार झाले.

तिसरी घटना त्याच रस्त्यावर घडली. नंदुरबार ते वाका चार रस्ता या दरम्यान हॉटेल कल्याणी पॅलेसनजीक मोटारसायकलीवर आलेल्या तीन युवकांनी ट्रकला अडविले. पहाटे रस्ता सामसूम असल्यामुळे लुटारूंनी ट्रकच्या (क्रमांक एमएच 18 एए 775) केबिनमध्ये चढून चालक हरीश अशोक पाटील व संतोष नामदेव महाजन रा.दोंडाईचा यांना धमकावले. त्यांच्यावर काठीने वार करून आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाइलसह 20 हजार 600 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. ट्रकमध्ये तूर घेऊन चालक व सहचालक हे बडोदा ते अकोला असा प्रवास करीत होते. त्यांच्यावर गुरुवारी पहाटे हा प्रसंग ओढावला तरी उपनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरार्पयत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

युवकांची टोळी

लूटमार करणा:या युवकांची टोळीच कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. कारण शहरात घडलेल्या तिन्ही घटनामंधील फिर्यादीने केलेले युवकांचे वर्णन एकसारखेच आहे. त्यामुळे हा संशय बळावतो. ट्रकचालकांना लुटल्याच्या घटनेत पल्सर मोटारसायकलीचा नंबर (एमएच 19-9675) हा पोलिसांना देण्यात आला आहे. परंतु लूटमार करणा:यांनी नंबरप्लेट बोगस लावलेली असू शकते. त्यामुळे त्यादृष्टीनेही पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे.

शहरासह परिसरात चार ते पाच वर्षापूर्वी युवकांची अशीच एक टोळी सक्रिय झाली होती. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पोबारा करण्यात ते पटाईत होते. त्या वेळी पोलिसांनी त्या टोळीचा छडा लावला होता. आता पुन्हा तशीच टोळी सक्रिय झाल्याने पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास करणे गरजेचे आहे.

मोटारसायकलींची चोरी

शहरात लूटमारीच्या घटनांसह गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकलींच्या चोरीच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. शहरातील प्रत्येक भागातून दरदिवसाआड एकतरी मोटारसायकल चोरीस जात असल्याच्या नोंदी आहेत.

पोलीस काही मोटारसायकल मालकांना आधी तपास करण्याच्या सूचना देतात, तीन ते चार दिवस तपास करा, सापडली नाही तर फिर्याद द्या म्हणून नागरिकांची बोळवण करीत असल्याचे प्रकारदेखील होत आहेत. त्यामुळे लूटमार आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांमधील आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.