शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

धुळे मनपा महासभेत दूषित पाणीपुरवठ्यासह कचरा संकलनावरून चिखलफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:31 IST

आमदारांवर टिकास्त्र, जिल्हा ग्रंथालय जागेच्या आरक्षणाचा विषय बारगळला

ठळक मुद्दे- कचरा संकलनात अधिकारीच हिस्सेदार असल्याची टिका - शहरातील चर्चा हेच आमदारांचे भांडवल असल्याचा आरोप- लेखापरीक्षण अहवाल मनपाची सामुहीक जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराला होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यासह कचरा संकलनाचा प्रश्न मंगळवारी झालेल्या महासभेत गाजला़ दूषित पाणी प्रश्न गांभिर्याने घेण्याची मागणी सदस्यांनी केली़ तर कचरा संकलनाच्या ठेक्यावरून प्रशासनाला जाब विचारण्यात आला़ महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर उमेर अन्सारी, नगरसचिव मनोज वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली़ सभेच्या सुरूवातीला दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली़ नगरसेवक अमिन पटेल यांच्यासह साबीर सैय्यद मोतेबर, प्रतिभा चौधरी, अमोल मासुळे यांनी प्रशासनाला दूषित पाणीपुरवठ्याचा जाब विचारला़ दूषित पाणीप्रश्न गांभिर्याने घेऊन कार्यवाही करावी व सक्षम अधिकारी, कर्मचाºयांनी नेमणूक पाणीपुरवठ्यासाठी करावी, असे आदेश महापौर कल्पना महाले यांनी प्रशासनाला दिले़ नगरसेवक कैलास चौधरी, नरेंद्र परदेशी, मनोज मोरे, संजय जाधव, साबीर सैय्यद यांनी देखील कचरा संकलनावरून प्रशासनाला जाब विचारला़ शहरातील जनता आयुक्तांना कचराशेठ म्हणून ओळखू लागल्याचा आरोप नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी केला़ त्यानंतर २०१२-१३ च्या लेखापरीक्षण अहवालावर चर्चा झाली़ विभागप्रमुखांना प्रत्येक आक्षेपावर खुलासा करावा लागणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले़ उर्वरीत विषय मंजूर करण्यात आले़ शहरातील शासकीय ग्रंथालयासाठी जागेचे आरक्षण बदलण्याच्या विषयावरून नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आमदारांवर टिका केली़ बेकायदेशिर कामांमुळे शहरात होणारी चर्चा हेच आमदारांचे भांडवल असल्याचे ते म्हणाले़ तसेच सद्यस्थितीत प्रस्तावित जागेवर उद्यानाचे आरक्षण असतांना काम सुरू झालेच कसे? असा जाबही त्यांनी विचारला़ सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकाम परवानगी नाकारली असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले़ अखेर हा विषय महापौरांनी तहकूब केला़ संबंधित विषयावर साबीर सैय्यद, मनोज मोरे यांनी देखील परदेशी यांच्या भुमिकेला समर्थन दिले़  

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका