* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
#प्लाझ्मा दान करणे*#
प्लाझ्मा हा रक्तातील एक पिवळसर द्रव्य घटक असून, त्याचे रक्तातील प्रमाण सुमारे ५५ टक्के इतके असते. यामध्ये माणसाच्या जीवनावश्यक घटकद्रव्य, पेशी आणि विशेषता प्रथिने असतात. कोरोना आजारातून संपूर्ण बऱ्या झालेल्या व्यक्तींचा सुमारे २८ दिवसानंतर प्लाझ्मा काढून तो प्लाझ्मा कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तीला देण्याची प्रक्रिया म्हणजे प्लाझ्मा थेरेपी, कोरोना आजारातून बरी झाल्यानंतर व्यक्ती २८ दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकते, साधारणत: चारशे एमएल प्लाझ्मा एका वेळेस दान करू शकतात. योग्य पौष्टिक आहार (प्रथिने, विटामिन सी) व पुरेशी निद्रा (८ तास ) रोज तीन ते चार लीटर पाणी प्यावे, प्राणायाम करावे, हे केल्यास नक्कीच आपण लवकर हे महायुद्ध जिंकणार आहोत.
डॉ.जयपाल पाटील, मालपूर ता.शिंदखेडा
मोरया सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, मालपूर