शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय समितीकडून धुळे जिल्ह्यातील ११ गावांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 11:24 IST

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण  : पथकाने शाळा, अंगणवाडी, गावातील स्वच्छतेची केली पहाणी

ठळक मुद्देजिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींची तपासणी पथकाने शाळा, अंगणवाडीची तपासणी केली. निकाल सप्टेंबर २०१८ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे

आॅनलाइन लोकमत  धुळे : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत केंद्रीय समितीकडून जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींची तपासणी नुकतीच करण्यात आली.  समिती हा अहवाल केंद्राला सादर करणार आहे. सप्टेंबर मध्ये याचा निकाल जाहीर होऊन, उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा २ आॅक्टोबर रोजी सन्मान केला जाणार आहे.केंद्र शासनाकडून १ ते ३१ आॅगस्ट १८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ (ग्रामीण) केले जात आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून ही पहाणी १६ ते १९ आॅगस्ट दरम्यान  धुळे तालुक्यातील सावळदे, चांदे, गोताणे, शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा, चिमठाणे, रहिमपुरे, साक्री तालुक्यातील धनेर, जांभोरे, रूणमळी, तर शिरपूर तालुक्यातील उमर्दा, कोडीद या गावांमध्ये तपासणी करण्यात आली. केंद्र शासानने यापूर्वीच महापालिका क्षेत्रात अशाप्रकारे सर्वेक्षण केले होते. आता ग्रामीण भागात हे सर्वेक्षण केले जात आहे. स्वच्छतेबाबत जाणिव जागृती, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेतलेल्या कामांचे गुणात्मक व संख्यात्मक मानकांच्या आधारे गुणांकन ठरविणे हा मुख्य उद्देश आहे. संस्थेचे प्रतिनिधी महेश लोखंडे, प्रफुल्ल बोरीकर, आरती गोसटकर यांच्या पथकाने शाळा, अंगणवाडीची तपासणी केली. त्यात अंगणवाडीसेविका मदतनीस यांच्याशी संवाद, स्वच्छ सर्वेक्षणासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती, शौचालयांची पहाणी केली. या शिवाय ग्रामपंचायतीमधील १५ ते २० व्यक्तींशी स्वच्छ भारत मिशन यावर संवाद साधला. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय, धार्मिक स्थळ, पर्यटनस्थळ, या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था, गावातील परिसर स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदींची तपासणी केली. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, सर्व गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,सरपंच, ग्रामसेवक ,  जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार, गटसंसाधन  केंद्रातील कर्र्र्र्मचारी आदींचे सहकार्य लाभले. संस्थेने केलेले गुणांकन गोपनीय असून, निकाल सप्टेंबर २०१८ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा २ आॅक्टोबर अर्थात महात्मा गांधी जयंतीदिनी सन्मान होणार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे