वर्शी : शिंदखेडा तालुक्यातील वर्शी येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या वतीने वर्शी येथील प्राचीन श्रीराम मंदिरापासून लेझीम व वाद्याच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात कलशधारी मुली अग्रभागी होत्या. गावातील विविध भागातून ही मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखी पूजन केले. पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पालखी मिरवणुकीत चित्ररथ तयार करण्यात आला होता. त्यात बालकांनी श्री गुरुदत्त, श्री स्वामी समर्थ आदी संतांचा सजीव देखावा सादर केला होता. हा देखावा लक्षवेधी ठरला.प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सारामृत वाचन, कालभैरव वाचन, होम हवन, पूजन आदी कार्यक्रम पार पडले. सायंकाळी पालखी मिरवणूक व रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी वर्शी व शिंदखेडा येथील सेवेकरी व भाविकांनी परिश्रम घेतले.
वर्शी येथे स्वामींची पालखी मिरवणूक जल्लोषात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:15 IST