लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील साक्री रोडवरील मोगलाई मासळी बाजार भागात संत शिरोमणी रोहिदास यांची जयंती साजरी झाली़आमदार फारुख शाह, नगरसेवक सुनील बैसाणे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, दिनेश जगताप, मुध्याध्यापक अण्णा सिताराम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संत रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले़ भुपेंद्र जगताप, नरेंद्र जगताप, मनोज कांबळे, सुनील कांबळे, अनिल चौधरी, कालू चौधरी, कैलास बागुल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले़ यशस्वितेसाठी जगदीश प्रजापत, अशोक सोनवणे, सुधीर कांबळे, दिपक कांबळे, मुकेश चौधरी, पप्पू सूर्यवंशी, भाऊ बागले, प्रविण शेलार, नितिन शेलार, हिमांशु शेलार, चंद्रकांत शेलार यांच्यासह परिसरातील नागरीकांनी परिश्रम घेतले़
संत रविदास जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 22:46 IST