प्रारंभी सरस्वती देवी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, स्व.हस्तीमल जैन, स्व. शांतिलाल जैन व स्व. कांतीलाल जैन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास शालेय समितीचे चेअरमन कैलास जैन, स्थानिक शालेय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी, सदस्य डॉ. बी.बी. पाटील, प्राचार्य हरिकृष्ण निगम आदी उपस्थित होते. शालेय संचालक मंडळ सदस्य डॉ. बी.बी. पाटील यांना खान्देश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केल्याबद्दल त्यांचा शाळेतर्फे सन्मान करण्यात आला. तसेच ऑनलाइन व्हर्च्युअल क्लासेससाठी तांत्रिक साहाय्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षिकांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला. समन्वयक श्रीराम मगर, राकेश साळुंखे, सुरेंद्र खंडारे, महेंद्र गिरासे, शीतल पाटील, हर्षदा भामरे, सुभद्रा नगराळे, प्रदीप वाघ आदींनी मनोगत व्यक्त केले. कैलास जैन, डॉ. बी. बी. पाटील, डॉ. विजय नामजोशी आदींनी मार्गदर्शन केले. शिक्षक-शिक्षिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या. सूत्रसंचालन समन्वयक भूषण दीक्षित व धनश्री दीक्षित यांनी केले. कार्यक्रमास हस्ती गुरुकुलचे मुख्याध्यापक सदाशिव महाजन, हस्ती वर्ल्ड स्कूल प्राचार्य गोविंद गांगुर्डे, उपप्राचार्य अरुण पाटील, हस्ती पब्लिक स्कूलच्या उपप्राचार्या रजिया दाउदी, हस्ती पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका पूनम पाटील, हस्ती विद्यारंभ सेमी इंग्लिश बालवाडी मुख्याध्यापिका स्मिता साठे, ओ. एस. रेखा गाडेकर, हस्ती किंडर गार्टेन समन्वयिका लीना सोनवणे, प्राथमिक विभाग समन्वयक श्रीराम मगर, राकेश साळुंखे, समन्वयिका समीना बोहरी, शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
हस्ती ग्रुप ऑफ स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST