साक्री येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीला प्रभारी निवासी नायब तहसीलदार गोपाळ पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरे, पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.
यावेळेस पोलीस निरीक्षक आहेर यांनी शांतता कमिटीच्या सदस्यांना व नागरिकांना आवाहन केले की, सण साजरे करायचे आहेत परंतु निर्बंधाच्या चौकटीत राहून ते साजरे करावेत. गणपतीची मूर्ती शक्यतो लहान असावी. गणपतीची स्थापना करताना परवानगीची आवश्यकता आहे. शाडूच्या मूर्तींची स्थापना करावी. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये. मिरवणुका व वाद्य वाजवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा. कायदा मोडण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.