लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वाढदिवस हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो. कुणी एखाद्या पर्यटन स्थळावर वाढदिवस साजरा करतो तर कुणी अनाथ, निराधार व्यक्तीसोबत वषार्तील हा विशेष दिवस घालवतो. शहरातील प्रौढाला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. मात्र सोबत असलेल्या रुग्णांनी रुग्णालयातच वाढदिवस साजरा करीत त्या व्यक्तीला अनोखी भेट दिली. यामुळे रुग्णाच्या चेहºयावर हास्य फुलले होते.कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्षणे विरहित, किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण देखील पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रचंड तणावात असतात. प्रत्येकाचा वाढदिवस त्या व्यक्तीसाठी, त्याच्या कुटुंबासाठी विशेष असतो. शहरातील एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्यावर जिल्हा रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्या व्यक्तीचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्याची माहिती सोबत उपचार घेत असलेल्या रुग्णांना झाल्यानंतर त्यांनी वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. त्यांच्या मित्रानी त्यांना केक उपलब्ध करून दिला. या अनोख्या भेटीमुळे रुग्णाचा रुग्णालयातील वाढदिवस देखील संस्मरणीय ठरला. यावेळी रुग्णांनी एकमेकांना केक भरवत आनंद व्यक्त केला.जिल्हा रुग्णालयात २० कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी काही रुग्ण लक्षणे विरहित तर काही जणांना सौम्य लक्षणे आहेत. तणाव दूर करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात रुग्णांकडून दररोज सकाळी योगासने व हलके व्यायामाचे प्रकार करून घेतले जातात. यामुळे रुग्णांमधील कोरोनाची भीती दूर होण्यास मदत होते. दरम्यान नेहमी धीर गंभीर वातावरण असणा?्या कोरोना वार्डातही वाढदिवसाच्या 'सेलिब्रेशन'मुळे चैतन्य फुलले होते.
रुग्णालयात वाढदिवस साजरा, रुग्णाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 19:29 IST