शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील ‘त्या’ रस्त्याप्रकरणी हरित लवादाकडे दाद मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:28 IST

पांझरा नदीकाठ परिसर : नगरसेवक नरेंद्र परदेशी यांची माहिती

ठळक मुद्देयाप्रकरणी न्यायालयात तारीख पे तारीख सुरू असल्यास रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने यातून मार्ग काढत हे प्रकरण पर्यावरण विभागाशी संबंधित असल्याने हरित लवादाकडे न्यावे, असे सांगितले आहे.त्यामुळे याप्रकरणी राष्टÑीय हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.प्रकरण न्यायालयात असताना रस्ते काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पांझरा नदीकाठाच्या दोन्ही बाजूस होणारा रस्ता बेकायदेशीर असल्याचे सांगत नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु, या रस्त्याचे प्रकरण पर्यावरण विभागाशी संबंधित असल्याने औरंगाबाद खंडपीठाने  याप्रकरणी राष्टÑीय हरित लवादाकडे (एनजीटी) दाद मागावी, असे सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणी  राष्टÑीय हरित लवादाकडे दाद मागणार असल्याची माहिती नगरसेवक परदेशी यांनी दिली. शासनाने पांझरा नदीकाठी रस्ते बांधण्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केला होता.मात्र, सदरचे अनुदान महापालिकेला देय असताना आमदार अनिल गोटे यांनी ते सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करण्यास भाग पाडले आहे़ याकामी लागणारा महासभेचा ठराव अद्याप झालेला नाही़ तसेच या रस्त्यांसाठी शासनाच्या विविध विभागांची परवानगी आवश्यक असून तीदेखील घेण्यात आलेली नाही़  त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा व मंजूर निधीत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी यापूर्वी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी जिल्हा प्रशासनाकडेही केली होती. तसेच याप्रकरणी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठातही याचिका दाखल केली होती. प्रकरण न्यायालयात असताना रस्ते काम सुरू नगरसेवक परदेशी यांनी याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात  याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना शहरात पांझरा नदीकाठाच्या दोन्ही बाजूला रस्ते कामास सुरुवात झाल्याचे मांडले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे या रस्ते कामाला स्थगिती द्यावी, असे परदेशी यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयाने स्थगिती देता येणार नाही, असे म्हटले.