शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

पारोळाचे माजी नगराध्यक्षांच्या कारच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:06 IST

जयहिंद चौकातील घटना : गाडीत पैसे असल्याच्या संशयावरुन लोकसंग्रामच्या कार्यकत्यांकडून दगडफेक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील जयहिंद चौकात रात्री आठ वाजेच्या सुमारास जळगावकडून येणाºया गाडीत पैसे असल्याचा संशय आल्याने लोकसंग्रामचे प्रभाग पाचमधील उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवून  दगडफेक करुन गाडीचे नुकसान केले. ती गाडी पारोळाचे माजी नगराध्यक्ष आणि भाजयुमोचे शहराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरुडे यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दगडफेक प्रकरणी अटक झालेल्या लोकसंग्रामचे दिलीप साळुंखे यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी आमदार अनिल गोटे यांनी देवपूर पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन केले. राष्टÑवादीचे माजी स्थायी समिती सभापती कैलास चौधरी हे सुद्धा त्याठिकाणी आंदोलनात सहभागी झाले. शेवटी शिरुडे यांनी फिर्याद मागे घेतल्याने साळुंखेची सुटका झाली आणि दोन तासांपासून सुरु असलेल्या नाट्यावर पडदा पडला. शहरातील जयहिंद चौकात रात्री आठ वाजेच्या सुमारास लोकसंग्रामचे प्रभाग पाचमधील उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे आपल्या कार्यकर्त्यांसह उभे असतांना त्यांना एमएच १९ सीएफ १६१६ क्रमांकाची कार येतांना दिसली. जळगाव पासिंगची कार असल्याने त्यात पैसे असल्याचे संशय आल्याने त्यांनी कार थांबविली. कारमधील लोकांची विचारपूस सुरु केली असता कारमध्ये बसलेले दोन जण हे गाडीतून उतरुन पळाले. त्यामुळे अधिक संशय आल्याने लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केली. त्यात गाडीच्या काचा फुटल्या. ती कार पारोळाचे माजी नगराध्यक्ष आणि भाजयुमोचे शहराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरुडे यांची होती आणि ते स्वत: गाडीत होते. हा सर्वप्रकार घडत असतांना त्याठिकाणी गर्दी झाली. तेव्हा देवपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दगडफेक करुन कारच्या काचा फोडल्याप्रकरणी दिलीप साळुंके यांना अटक करुन देवपूर पोलीस स्टेशनला आणले. ही घटना आमदार अनिल गोटे यांना कळाल्यानंतर ते तातडीने पोलीस स्टेशनला दाखल झाले. आमदारांचा ठिय्याघटनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आमदार गोटे यांनी पोलीस अधिकारी यांना गाडीतून पळून गेलेले दोन जणांना अटक करा, अन्यथा दिलीप साळुंखे यांना सोडा. तसे करणार नसलातर मलाही अटक करा असा पावित्रा घेत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. यावेळी डीवायएसपी सचिन हिरे, धुळे शहरचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, देवपूरचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी आमदार गोटे यांच्याशी चर्चा केली. त्यांना यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. परंतु आमदारांनी  कारमधील पळालेल्या अन्य दोन जणांना अटक करा़ अन्यथा मला अटक करा, असे सांगून तेथून जाण्यास इन्कार केला. हे नाट्य घडत असतांना पोलीस दिलीप साळुंखे यांना जिल्हा रुग्णालयात मेडिकल चेकअपसाठी घेऊन गेले़ दरम्यान, कारच्या काच फुटल्याने पारोळाचे माजी नगराध्यक्ष शिरुडे यांना दिलीप साळुंखे यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस दबाव आणत असल्याचा आरोप आमदारांनी केला.राष्टÑवादीचे कैलास चौधरींची पोलीस स्टेशनला एन्ट्रीआमदाराचे ठिय्या आंदोलन सुरु असतांनाच त्याला पाठिंबा देण्यासाठी राष्टÑवादीचे माजी स्थायी समिती सभापती व प्रभाग चारमधील राष्टÑवादीचे उमेदवार कैलास चौधरी आपल्या समर्थकांसह त्याठिकाणी पोहचले. त्यांनीही आमदारांसोबत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरु केले. तसेच याप्रकरणी कारमधून पळालेल्या दोन जणांना अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्हालाही अटक करा, असा पावित्रा घेतला.गर्दी वाढलीहा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये सुरु असतांना बाहेर गर्दी वाढत होती. लोकांची वाढती गर्दी आणि आतील आंदोलन यामुळे पोलीस अधिकारी आमदार गोटे यांच्याकडे आग्रह करु लागले. हे नाट्य सुरु असतांना दिलीप साळुंखे यांच्याविरोधात फिर्याद देणारे पारोळाचे गोविंद शिरुडे यांनी आपण आपली फिर्याद मागे घेतो, असे सांगितले. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास घेतला. फिर्याद मागे घेतल्यामुळे दिलीप साळुंखे यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना सोडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.पोलीस अधिकारी यांनी आमदार अनिल गोटे यांना ही माहिती दिली. तसेच वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलेल्या दिलीप साळुंखे यांना सोडण्यात येईल असे सांगितले. तेव्हा  आमदार अनिल गोटे यांनी आंदोलन मागे घेऊन पोलीस स्टेशनमधून बाहेर आले.  बाहेर  उपस्थित नागरिकांचे आभार मानले. व घटनेची माहिती दिल्यानंतर तेथून निघाले.   त्यामुळे  दोन तासानंतर नाटयावर  पडदा पडला.

टॅग्स :Dhuleधुळे