शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Dhule Municipal Election 2018 : उमेदवारांनी रॅलीने केला प्रचाराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:41 IST

प्रचार थांबला : शनिवारी सायंकाळी कर्मचारी व अधिकारी मतदान केंद्रावर रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसापासून सुरु असलेला प्रचार शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता संपला. रविवारी होणाºया मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाचे साहित्य घेऊन शनिवारी सायंकाळी सर्वच अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होतील. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसापासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी साडे पाच वाजता थांबली.शक्ती प्रदर्शन - शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी शक्ती प्रदर्शन केले. काँग्रेस- राष्टÑवादी आघाडीतर्फे प्रभागातून प्रचार रॅली किंवा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे सहभागी झालेत. लोकसंग्रामतर्फे एकत्ररित्या प्रचार रॅली काढण्यात आली. त्यात १९ प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराच्या गाडया आणि शेवटी नदीकाठावरील झुलता पुलावर बसविण्यात येणारी शंकराची मूर्तीही ट्रॉलीवर आणण्यात आली होती. रॅलीत आमदार अनिल गोटे, माजी नगराध्यक्ष हेमा गोटे यांच्यासह सर्व उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. भाजपतर्फे अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्यापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यात माजी महापौर मंजुळा गावीत, डॉ.माधुरी बाफना यांच्यासह अन्य पदाधिकारी महिला सहभागी झाल्या होत्या. शिवसेनेतर्फे पेठ भागातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत खासदार संजय राऊत यांच्यासह सर्वच पदाधिकारी व उमेदवार सहभागी झाले होते. सायंकाळी साडे पाच वाजेनंतर सर्वच प्रचार तोफा थंडावल्यात.शहरातील बॅनर, झेंडे काढले - सर्वच पक्षाने आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी दुपारीच सर्वच बॅनर, झेंडे काढून घेतले.  महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या कार्यवाहीची पाहणी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली़  नगावबारी येथील शासकीय गोडाऊन येथे मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी   सकाळी ९ वाजता मतदान केंद्रावरील कर्मचाºयांना साहित्य वाटप केले जाणार आहे़  नगावबारी येथील व्यवस्थेची पाहणी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य अधिकारी यांच्यासमवेत करण्यात आली़ यात वाहन व्यवस्था, मतदान साहित्य वाटप व्यवस्था, मीडिया कक्ष उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़  त्याप्रमाणे आवश्यक त्या दुरुस्त्या व बदल करण्यात आले़ मतदान कर्मचाºयांना मतदान प्रक्रियेत तसेच मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही व सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असे नियोजन प्रशासनाने केले आहे़ आज साहित्य वाटप, कर्मचाºयांसाठी बसेसची व्यवस्था़नगावबारी येथील शासकीय गोडाऊन येथे सकाळी नऊ वाजता सदर ठिकाणाहून मतदान यंत्र व अन्य साहित्यांचे वाटप होणार आहे़ सदर मतमोजणी केंद्र शहरापासून लांब असल्याने तेथे जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे़ मतदान केंद्रावर नियुक्त केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी व शिपाई यांना या परिवहन सेवेचा लाभ घेता येणार आहे़  त्यासाठी धुळे आगार व देवपुर बस स्थानक येथून सकाळी साडेआठ वाजता व नऊ वाजता मतमोजणी केंद्रापर्यंत जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सकाळी ९ वाजता मतदान अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी उपस्थित राहणार आहे. सर्व मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचाºयांना याठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारुन सर्व कर्मचारी व अधिकारी हे केंद्रावर पोहचणार आहे.

टॅग्स :DhuleधुळेDhule Municipal Election 2018धुळे महापालिका निवडणूक