लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील साक्री रोडवर असलेल्या कॅनरा बँकेचे एटीएम मशिन चोरट्याने फोडले़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़ सकाळी ही बाब उजेडात आली़ घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत़शहरातील साक्री रोडवर असलेल्या विद्यावर्धिनी महाविद्यालयाजवळ कॅनरा बँकेचे एटीएम मशिन आहे़ चोरट्याने हे मशिन फोडले आहे़ मशिन फोडले असलेतरी त्यातील रक्कम लंपास झाली आहे का, रक्कम लंपास झाली असेल तर ती किती होती की केवळ चोरीचा प्रयत्न झाला, चोरट्यांच्या हाती काय गवसले, या अनुषंगाने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत़ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत़ दरम्यान, सर्वसामान्य नागरीकांनी घटनास्थळी गर्दी केली होती़
धुळ्यात कॅनरा बँकेचे एटीएम मशिन फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:06 IST