शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात चोरट्यांनी मांडला उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 19:05 IST

तीन मेडीकलसह गॅस एजन्सी लक्ष : पोलिसांसमोर उभे राहिले आव्हान, रोकड लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात चार ठिकाणी चोरट्यांनी हजारो रुपयांवर डल्ला मारला़ पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तीन मेडीकल दुकानांसह एका गॅस एजन्सीला लक्ष केले़ एकाच दिवसात चोरीच्या चार घटना घडल्यामुळे त्यांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे़ गेल्या आठवड्यांपासून शहरात कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत़ साक्री रोडवरील कुमारनगर भागात एका पाठोपाठ एक याप्रमाणे सलग दोन दिवस चोरट्यांनी उच्छाद मांडत लाखों रुपये लंपास केले़ त्यानंतर अग्रवाल नगर भागात मिरचीची पूड डोळ्यात फेकून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली रोकड ही दुचाकीसह चोरुन नेल्याची घटना ताजी असताना रविवारी पहाटे पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ एकाच दिवसात ३ मेडीकल दुकान आणि एक गॅस एजन्सी फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले़ सोना मेडीकलशहरातील आग्रा रोडवरील रामवाडी समोरच सोना मेडीकल आहे़ या मेडीकल दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करीत चोरट्याने सुमारे ७ हजार ५०० ते १० हजाराचा ऐवज लंपास केला़ चोरीची ही घटना सकाळी उजेडात आली़ अर्चना मेडीकलशहरातील आग्रा रोडवरच गणपती पॅलेस जवळ अर्चना मेडीकल आहे़ या मेडीकल दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करीत चोरट्याने रोकड लंपास केली़ चोरीची ही घटना सकाळी उजेडात आली़न्यू सेवा मेडीकल शहरातील लेनिन चौकात न्यू सेवा मेडीकल दुकान आहे़ अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या मेडीकल दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करीत चोरट्याने सुमारे ७० हजाराचा ऐवज लंपास केला़ चोरीची ही घटना सकाळी उजेडात आली़पोलीस तातडीने दाखलचोरीच्या या घटनांची माहिती एका पाठोपाठ मिळत गेल्याने पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांच्यासह शहर पोलिसांचे पथकाने देखील चोरीच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली़ स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी देखील तातडीने घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली़ घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़ एकलव्य गॅस एजन्सीवर डल्लाधुळे : शहरातील ८० फुटी रोडवर अग्रसेन चौकात के़ डी़ मिस्तरी कॉम्प्लेक्समध्ये एकलव्य गॅस एजन्सी आहे़ ही एजन्सी चोरट्याने फोडली आणि गल्यातील रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली़ घटनेची माहिती मिळताच श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते़  घटनेचे वृत्त पसरल्यानंतर याठिकाणी गर्दी जमा झाली होती़ याप्रकरणी एकलव्य गॅस एजन्सीचे व्यवस्थापक दिनेश प्रभाकर चौधरी (रा़ प्रमोद नगर, देवपूर) यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दुपारी फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, चोरट्यांने एजन्सीचे शटर तोडून आत प्रवेश करीत २५ हजार रुपये रोख लंपास केले़ याप्रकरणी भादंवि कलम ४५७, ३८०, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ दरोड्या होती चर्चाअग्रसेन चौकात असलेल्या एकलव्य गॅस एजन्सीच्या येथे चार ते पाच जण हातात शस्त्र घेऊन आले़ त्यांनी वॉचमनला पिस्तूलचा धाक दाखविला़ त्याला मारहाण करीत एजन्सी फोडली आणि रोकडसह कागदपत्र घेऊन पोबारा केल्याची चर्चा सकाळपासून सुरु होती़ मात्र या चर्चेला पोलिसांनी नकार दिला़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी