लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी पाकिस्तानमधून सुखरुप परतलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्याविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे. शहरातील महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी आपल्याच पक्षाचे खासदार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात काढलेल्या पत्रकात भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्यासंदर्भात भग्गोडा शब्द वापरला होता. यावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. पुतळा दहन करताना राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, संजय वाल्हे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़
आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 13:08 IST
महाराणा प्रताप चौक : राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार, काही काळ तणाव
आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे दहन
ठळक मुद्देआक्षेपार्ह बोलण्यावरुन रणकंदनधुळ्यात आमदारांच्या पुतळ्याचे दहनमहाराणा प्रताप चौकात तणावपूर्ण शांतता