शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरला शिसाकासाठी शेतकºयांचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:30 IST

१२ किमी होते अंतर : मोर्चेकरांना पोलिसांनी थांबविल्याने उडाला गोंधळ

ठळक मुद्देमोर्चेकरी वाडी येथे पोहचल्यानंतर चेअरमन माधव पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर मोर्चेकºयांना पोलिसांनी थांबविले़ त्यावेळी अर्धातास गोंधळ सुरू होता़ चेअरमनच्या घरापर्यंत मोर्चा नेवू द्यावा अशी भूमिका मोर्चेकरांनी घेतल्यानंतर वातावरण तंग झाले़ चेअरमन पाटील यांच्या घरासमोर बंदोबस्त होता़

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद आहे, तो सुरू व्हावा; या मागणीसाठी शिसाका चेअरमन राहत असलेले १२ किमी अंतरावरील वाडी गावापर्यंत सर्वपक्षीय १० बैलगाड्या असलेला मोर्चा वाजत-गाजत मंगळवारी दुपारी काढण्यात आला़ दरम्यान, मोर्चकºयांना चेअरमन यांच्या घराजवळ  पोलिसांनी अडविल्यामुळे तेथे अर्धा तास गोंधळ झाला होता. शहरातील बाबुराव वैद्य मार्केटपासून मोर्चा दुपारी ४ वाजता सुरूवात झाली़ मोर्चा मेनरोड मार्गाने पाचकंदिल चौक, वाघाडीमार्गे वाडी येथे राहत असलेले कारखान्याचे चेअरमन माधव आनंदराव पाटील यांच्या गावापर्यंत काढण्यात आला़   मोर्चात भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, तालुका प्रभारी डॉ़ जितेंद्र ठाकूर, दिलीप लोहार, अशोक श्रीराम, अ‍ॅडग़ोपाल राजपूत, मोहन पाटील, नगरसेवक राजेंद्र गिरासे,    मयूर राजपूत, अ‍ॅड़ अमित जैन, नगरसेवक रोहित रंधे, सेनेचे भरतसिंग राजपूत, राजू टेलर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, ईश्वर बोरसे, मिलिंद पाटील, अरूण धोबी, प्रमोद पटेल, चेतन पाटील यांच्यासह शेतकरी विकास फाऊंडेशन, युवा शेतकरी मंच, ऊस उत्पादक व कामगार आदी सहभागी झाले होते़  डॉ़ जितेंद्र ठाकूर यांनी गेल्या ६ वर्षापासून साखर कारखाना बंद आहे़ केवळ २६ कोटी रूपयांसाठी कारखाना बंद राहतो, हे दुर्दैव आहे़ आता मात्र २ कोटी रूपये देवू अशी वल्गना त्यांच्याकडून केली जात आहे़ यावेळी अ‍ॅड़अमित जैन, राहुल रंधे व तुषार रंधे, अशोक श्रीराम यांनीही मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड़ गोपाल राजपूत यांनी मोर्चेच्या उद्देशाबाबत माहिती दिली़ 

टॅग्स :DhuleधुळेShirpurशिरपूर