शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

रस्त्याच्या कामांना अतिक्रमणांचा ‘ब्रेक’!

By admin | Updated: March 13, 2016 00:06 IST

16 रस्त्यांपैकी आतार्पयत केवळ सात रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत़

धुळे : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील 16 रस्त्यांच्या कामांसाठी 43 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आह़े दरम्यान या कामांची निविदा प्रक्रिया राबवून दोन महिने झाल्यानंतर देखील कामांना अजून सुरुवात झालेली नाही़ 16 रस्त्यांपैकी आतार्पयत केवळ सात रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत़ अतिक्रमणासह वेगवेगळी कारणे देऊन आतार्पयत या कामात टाळाटाळ झाली असली तरी अर्थकारणाचाच प्रमुख अडसर असल्याचे दिसून येत आह़े

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत महापालिकेस 16 डीपी रस्त्यांसाठी 43 कोटी 72 लाख 34 हजार 964 रुपयांचा निधी प्राप्त झाला आह़े सदर रस्त्यांची सद्य:स्थिीतील अवस्था व वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन निवड करण्यात आली आह़े मात्र कामाचे कार्यादेश देऊनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही़ नगरोत्थान योजनेतही पहिल्यापासूनच वादविवाद उद्भवले आहेत़ शंभर फुटी रस्त्याच्या निविदा प्रक्रियेचा वाद न्यायालयात प्रलंबित आह़े तर अन्य दोन रस्त्यांसाठी फेरनिविदा काढली जाणार असल्याचे सांगण्यात आल़े

अतिक्रमणांचा अडथळा

सदर रस्त्यांवर असलेले अतिक्रमण हटविण्याबाबत मनपा प्रशासनाने अनेकदा बैठका घेतल्या आहेत़ सर्व रस्त्यांचे सव्रेक्षण करून अतिक्रमण मोहिमेचा आराखडा तयार देखील करण्यात आला़ परंतु प्रत्यक्ष अतिक्रमण काढण्याच्या वेळी रस्त्यांची रुंदी अतिक्रमणांमुळे कमी झाल्याचे दिसून आल्याने प्लेन टेबल सव्रेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े परंतु या सव्रेक्षणासाठी निविदा काढायची की एखाद्या खासगी संस्थेची मदत घ्यायची, याबाबत विचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी सांगितल़े सर्व रस्त्यांवर अतिक्रमण असून काही रस्त्यांवरील अतिक्रमण आतार्पयत काढण्यात आले आह़े जे अतिक्रमण काढण्यात आले आहे, त्या रस्त्यांच्या कामांना तरी सुरुवात करणे आवश्यक आह़े परंतु ठेकेदारांची अनुत्सुकता दिसून येत आह़े

अर्थकारणाचा अडसर

मुळात या योजनेच्या निविदा भरण्यापासूनच योजनेत मोठे अर्थकारण होत असल्याची चर्चा मनपा आवारात रंगत आह़े एवढेच नव्हे तर काही नगरसेवकांसह पदाधिकारी बिनधास्तपणे टक्केवारीची चर्चा करीत असल्याचेही यापूर्वी दिसून आले आह़े त्यामुळे ठेकेदारही हैराण झाले असल्याने ते कामे सुरू करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आह़े दोन वेळा नोटिसा देऊनही ठेकेदारांनी मनपाशी कामांचा करार करण्याबाबत टाळाटाळ केली होती़ त्यानंतरही आतार्पयत केवळ सात कार्यादेश देण्यात आले आहेत़ दरम्यान प्रस्तावित 16 रस्त्यांपैकी एका रस्त्यावर फक्त एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत़ मात्र मनपा प्रशासनाकडून शहरातील सर्व एलईडी पथदिवे बदलण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याने योजनेंतर्गत होणारे एलईडीचे काम थांबविले जाणार आह़े